USA vs PAK, Azam Khan Angry On Fans : टी-20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना युएसए आणि पाकिस्तान (USA vs PAK) यांच्यात डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला जात आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचं कर्तृत्व उघडकीस आलंय. लिंबू टिंबू अशा युएसए संघाने पाकिस्तानच्या फलंदाजीची पोलखोल केली. बाबर आझम (Babar Azam) आणि शाबाद खानला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यामुळे तगड्या पाकिस्तानची युएसने 20 ओव्हरमध्येच हवा काढलीये. युएसएने पाकिस्तानला 159 धावांवर रोखलं. मात्र, या सामन्यात चर्चेचा विषय राहिलाय तो पाकिस्ताचा पैलवान आझम खान...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युएसएविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज आझम खान (Azam Khan) गोल्डन डकवर आऊट झाला. त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर फिरकीच्या जाळ्यात तो अडकल्याने आला तसा त्याला माघारी जावं लागलं. मात्र, तो आऊट होऊन डगआऊटमध्ये परतत असताना त्याला काही चाहत्यांनी डिवचलं. त्यामुळे आझम खान चांगलाच भडकला. डिवचणाऱ्या फॅन्सकडे पाहून आझमने खुन्नस दिली. मात्र, इतर साथीदारांनी त्याला आवरलं अन् तो ड्रेसिंग रुमच्या दिशेने परतला.


इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यातही आझम खान गोल्डन डकचा बळी ठरला होता. आझम खान खराब फॉर्ममधून जात आहेत. त्याचवेळी त्याच्या खराब फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फिटनेस नसली तरी देखील त्याच्या फॉर्मवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे.


पाहा Video



पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.


युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.