Babar Azam, PSL 2023: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur Marriage) येत्या 27 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. त्याआधी केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल (Axer Patel) लग्नाच्या बेड्यात अडकले. त्यामुळे आता क्रिकेटविश्वास लग्नाचं सोहळे रंगताना दिसत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझमने (Babar Azam) लग्नाबद्दल (Marriage) आपलं मत मोकळेपणाने मांडलं आहे. पत्रकार परिषदेत (Press Conference) उत्तर देताना बाबरने रोखठोक उत्तर दिलंय. (babar azam marriage reveals when he will get married before peshawar vs lahore psl 2023 match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताप्रमाणे शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi Marriage), शान मसूद आणि शादाब खान या खेळाडूंनी लग्न उरकून घेतलंय. त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आता बाबर आझमच्या लग्नाची (Babar Azam Marriage) वाट पाहत आहेत. त्यामुळे बाबर लग्न करणार तरी कधी? अशी चर्चा पाकिस्तानच्या चौकाचौकात होताना दिसत आहे. पीएसएलच्या सामन्यापूर्वी बाबर पत्रकारांच्या प्रश्नांना  (Babar Azam Press Conference) सामोरं गेला.


आणखी वाचा - 6,6,6,6,6,6... Babar Azam ने एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स; पाहा Video


28 वर्षीच्या बाबरला एका पत्रकाराने त्याच्या लग्नाबद्दल विचारलं. यावर बोलताना बाबरने लाजून मजेशीर उत्तर दिलंय. पीएसएलमधील (PSL 2023) पेशावर जाल्मी आणि लाहोर कलंदर यांच्यातील सामन्यापूर्वी त्याने प्रश्नांची उत्तरं दिली. बाबर, तू पाकिस्तानचा कॅप्टन आहे. तुमच्या टीममधील सर्व खेळाडूंची लग्न झालीत आणि तुझे केस आता पांढरे होत आहेत. तु लग्न कधी करणारेस? असा सवाल बाबरला विचारण्यात आला. त्यावर बाबरने मजेशीर उत्तर दिलंय.


काय म्हणाला Babar Azam?


माझे पांढरे केस वयामुळे नाही, ते पहिल्यापासूनच पांढरा आहेत. एक लक्षात घ्या, लग्न वेळ आल्यावर होईल. मी पण वेळेची वाट पाहतोय, तुम्ही पण वाट पहा, असं म्हणत बाबर (Babar Azam talk on Marriage) लाजल्याचं पहायला मिळालं.


पाहा Video - 



बाबरचा बेडरूम व्हिडिओ (Babar Azam Viral Video)


इन्स्टाग्रामवरील ईशा राजपूत (Isha Rajput) नावाच्या हँडलवर फोटो आणि व्हिडीओ (Babar Azam Video Leaked) शेअर केले होते. त्यात दिसणारी व्यक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचं सांगितलं जातं होतं. त्यामुळे तो हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकला का?, असा सवाल विचारला जात होता. त्यामुळे बाबरला संघातून काढून टाकावं, अशी मागणी देखील केली जात होती.