Chetan Sharma Resigns: मोठी बातमी! चेतन शर्मांचा अखेर Game Over; BCCI कडे सोपवला राजीनामा
Chetan Sharma resign : चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर तो स्विकारण्यात आला आहे
Chetan Sharma resign : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (Bcci) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma resign) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (jay shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. Zee News चे स्टिंग ऑपरेशन #GameOver मध्ये चेतन शर्मा यांचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर क्रिकेटच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मैदानावर पुनरागमन करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू विशिष्ट इंजेक्शन घेत असल्याचा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला होता. त्यानंतर आता शर्मा यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे चेतन शर्मा 7 जानेवारी 2023 रोजी पुन्हा बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र 40 दिवसांत चेतन शर्मा यांचा कार्यकाळ संपला आहे.
हे ही वाचा : Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा
Game Over : विराट आणि गांगुलीबाबत चेतन शर्मा यांचा मोठा गौप्यस्फोट
झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशननंतर (Zee News Sting operation #GameOver) चेतन शर्मा यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि फिटनेससाठी इंजेक्शनसह अनेक खळबळजनक खुलासे केले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. Zee Newsच्या स्टिंगमध्ये चेतन शर्मा यांनी संघाच्या निवडीबाबत, विराट कोहली- सौरव गांगुलीचा वाद, खेळाडूंची फिटनेस यासह अनेक मुद्द्यांवर मोठे खुलासे केले होते. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ते वादात सापडले होते.
Game Over : टीम इंडियामध्ये 'इंजेक्शन खेळ'... चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
भारतीय संघातील खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस प्रमाणपत्र मिळवतात, असा खुलासा चेतन शर्मा यांनी झी मीडियाच्या छुप्या कॅमेऱ्यासमोर केला होता. या व्हिडिओनंतरच चेतन शर्मा चर्चेत आले होते आणि सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. अशातच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने 7 जानेवारी रोजी चेतन शर्मा व्यतिरिक्त शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांना नवीन निवड समितीमध्ये संधी दिली होती