मुंबई : बीसीसीआयचं मुंबईत असलेलं मुख्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचं मुख्यालय आता मुंबईवरून बंगळुरूला हलवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी सगळ्या सदस्यांना पत्र लिहून याबाबत मत विचारलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयचं सध्याचं मुख्यालय मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये आहे. पण बंगळुरुमधल्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमी(एनसीए)मध्ये हे मुख्यालय हलवलं जाऊ शकतं. बीसीसीआयकडे बंगळुरू शहराच्या बाहेर गार्डन सिटीमध्ये ४० एकर जमीन आहे. या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलच्या सुविधेसोबत एनसीएला नवीन रुप देण्यात येणार आहे.


बीसीसीआयच्या सध्याच्या मुख्यालयामध्ये म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. त्यामुळे या सुविधा वाढवण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया द्या, असं पत्र खन्ना यांनी सदस्यांना पाठवलं आहे.


बंगळुरुमध्ये असलेली ४० एकर जमीन विमानतळाजवळ आहे. या ठिकाणी एनसीएचं काम सुरु आहे. या जमिनीचा वापर बीसीसीआय मुख्यालय उभारण्यासाठी होऊ शकतो, असं मत खन्नांनी मांडलं आहे.