मुंबई: टी 20 वर्ल्ड कप साठी बोटावर मोजण्याएवढेच दिवस शिल्लक आहेत. UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी टीम इंडियाला नवीन जर्सी मिळाली आहे. BCCI ने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंना नवीन जर्सी मिळाली आहे. यासंदर्भात BCCI ने ट्वीट करून माहिती दिली होती. विराटसेना या नव्या जर्सीत टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानशी (Pakistan) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) होणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे शेड्युल


भारत vs पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs न्यूजीलैंड- 31 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs अफगाणिस्तान- 03 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
भारत vs बी1- 05 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs ए2- 08 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
सेमीफाइनल 1- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
सेमीफाइनल 2- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
फाइनल- 14 नवंबर, 7:30 PM IST, दुबई.


टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी


स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर