Shubman Gill Controversial Catch: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये (WTC Final) भारतीय संघ 444 धावांचा पाठलाग करत आहे. मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारतीय संघाला रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात 3 मोठे धक्के बसले आहेत. पाचव्या दिवशी भारतीय संघाला 97 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 280 धावा करायच्या आहेत. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. शुभमनला बाद दिल्यानंतर त्याने सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट करत बाद देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सामना सुरु असतानाच अशी नाराजी व्यक्त केल्याबद्दल शुभमनवर कारवाई होणार की का? तसेच या प्रकरणामध्ये बीसीसीआय (BCCI) आयसीसीकडे काही दाद मागणार का? याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. शुभमनच्या विकेटसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनेही पहिली प्रतिक्रिया देत शुभमनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन 19 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळत असतानाच स्कॉट बॉलंडच्या गोलंदाजीवर चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मात्र स्लिपमध्य कॅमरून ग्रीनने शुभमनचा झेल पकडताना चेंडू जमीनीला लागल्याचं अॅक्शन रिप्लेमध्ये दिसलं. मात्र पंचांनी शुभमनला बाद घोषित केल्याने सोशल मीडियावर या विकेटबद्दल चांगलीच चर्चा सुरु झाली. अनेकांनी पंच अंधळे आहेत का, हा काय नाक्यावरच्या सामना आहे का, एवढं तंत्रज्ञान वापरुनही निकाल चुकतात कसे असा प्रश्नांचा भडीमार करत या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. पंचांनी अधिक झूम करुन चेंडू टेकला आहे की नाही पहायला हवं होतं असं चाहत्यांचं म्हणणं आहे. कॅमरूनच्या दोन बोटांमध्ये बरेच अंतर आहे आणि चेंडू जमीनीला टेकल्याचं दिसत असल्याचा अनेकांचा दावा आहे. 


शुभमनने पंचांवर साधला निशाणा, ते ट्वीट व्हायरल


चेंडू टेकल्याचं दिसूनही शुभमनला बाद देण्यात आल्यानंतर मैदानातच रोहित शर्माने पंचांबरोबरही चर्चा केली. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही शुभमनला तंबूत परतावं लागलं. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमने कॅमरून त्याचा झेल पकडतानाचा स्क्रीनशॉटमधील क्षण आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केला. त्याने हा फोटो पोस्ट करताना एखादी गोष्ट अगदी जवळून किंवा मोठी करुन पाहण्यासाठी वापरला जाणारा मॅग्निफाइंग ग्लास आणि डोक्यावर हात मारतानाचे इमोजी वापरले आहेत. म्हणजेच अजून बारकाईने याकडे पाहता आलं असतं आणि दिलेला निकाल हा डोक्यावर हात मारुन घेण्यासारखा आहे असं शुभमनला यामधून म्हणायचं आहे. शुभमने अप्रत्यक्षपणे पंचांना लक्ष्य केलं आहे. शुभमनचं हे ट्वीट चांगलेच व्हायरल झालं आहे. 12 तासांमध्ये त्याला 26,500 हून अधिक रिट्वीट मिळाले असून त्यावर जवळजवळ 10 हजार कमेंट्स आल्या आहेत.



नक्की वाचा >> जिंकायला हवेत 280 रन! लढाई आधीच विराटने शस्त्र टाकलं? 'त्या' Insta Story ने वाढवलं चाहत्यांचं टेन्शन


बीसीसीआयने काय म्हटलं?


शुभनने केलेल्या या पोस्टची चर्चा असताना त्याच्यावर नियमबाह्य वर्तवणूक केल्या प्रकरणी कारवाई होणार की काय यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच अशा महत्त्वाच्या सामन्यात एवढा मोठा निर्णय चुकवल्याने बीसीसीआय आयसीसीकडे याविषयी दाद वगैरे मागणार का याबद्दलच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र शुभमनचं व्हायरल झालेलं ट्वीट आणि हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यासंदर्भात बीसीसीआयने शुभमनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. याच विषयी बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "यावरुन वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आपण तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय स्वीकारायला हवा," असं शुक्ला म्हणाले. मात्र शुभमनवर कारवाईसंदर्भातील कोणतंही विधान त्यांनी केलेलं नाही.


नक्की वाचा >> ...तर WTC जिंकणं विसरा!; IPL चा उल्लेख करत रवी शास्त्रींनी खेळाडूंसहीत BCCI लाही झापलं


...तर आपण सामना जिंकू


तसेच राजीव शुक्ला यांनी भारतीय संघ विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानात असल्याने सामना जिंकू शकतो असं म्हटलं आहे. "अजिंक्य आणि विराट चांगलं खेळत आहेत. प्रत्येकाने सावधपणे खेळल्यास आपण हे लक्ष्य गाठू शकतो कारण लक्ष्य फार मोठं नाही," असं शुक्ला म्हणाले.