Jasprit Bumrah Injury Update: कॅप्टन रोहित शर्माचा हुकमी एक्का आणि टीम इंडियाची स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला होता. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून (Team India) बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे (Injury ) त्याची संघात निवड करण्यात आली नाही. त्यानंतर आयपीएलला देखील तो मुकला. त्यामुळे आता महत्त्वाच्या वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) तो खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सुरू असलेल्या आयपीएलनंतर टीम इंडिया WTC फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. अशातच त्याआधी बीसीसीआयने बर्‍याच दिवसांपासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत (Jasprit Bumrah Injury Update) मोठी अपडेट दिला आहे.


काय म्हणालं BCCI ?


विश्वचषकात कोण खेळणार? जसप्रीत बुमराहचं करियर (Jasprit Bumrah career) धोक्यात का? अशी चर्चा एकीकडे होत असताना आता बीसीसीआयने मोठं वक्तव्य केलंय. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी (ODI World Cup 2023) फिट होऊ शकतो, असा विश्वास बीसीसीआयने (BCCI) व्यक्त केला आहे. बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि तो वर्ल्ड कपपूर्वी फिट होईल, असा विश्वास बीसीसीआयला आहे.



आणखी वाचा - Virat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!


दरम्यान, स्टार जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटपासून लांब आहे. आशिया कप तसेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील बुमराह (Jasprit Bumrah) खेळला नव्हता. त्यानंतर आता तो आयपीएलमध्ये देखील नाहीये. बुमराहच्या जागी मोहम्मद सिरीज, उमरान मलिक, अर्शदिप सिंह यांनी संघात जागा मिळवली. त्यामुळे बुमराहची कमी जास्त जाणवली नाही. मात्र, वर्ल्ड कपमध्ये आता बुमराह कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.