मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात सचिनची १० नंबरची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाहीये जी रिटायर्ड झालीये. या यादीत सचिनच्या जर्सीचा नंबर दुसरा लागतो. 


फिल ह्यूजची जर्सी झाली होती रिटायर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेंडुलकरच्या जर्सीआधी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्यूजच्या जर्सी नंबरला रिटायर करण्यात आले होते. २७ नोव्हेंबर २०१४मध्ये एका सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने फिल ह्यूजचे निधन झाले. यानंतर ऑस्ट्रेलिया बोर्डाने त्याच्या सन्मानार्थ जर्सी नंबर ६३ला रिटायर घोषित केले होते. 


बीसीसीआयने केली घोषणा


यानंतर आता बीसीसीआयने बुधवारी सचिनची जर्सी नंबर १०ला अनधिकृतरित्या रिटायर घोषित केले. दरम्यान, सचिन हा भारताचा पहिला खेळाडू आहे ज्याची जर्सी रिटायर झालीये. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर आता कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या नंबरची जर्सी घालून मैदानात उतरणार नाही. 


तेंडुलकर २०१२मध्ये १० नंबरची जर्सी घालून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१३मध्ये रिटायरमेंटच्या घोषणेनंतर या नंबरची जर्सी रिटायर करण्याची मागणी करण्यात आली होती.