Virat Kohli Epic Chat With Fan : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आगामी न्यूझीलंड विरुद्ध टेस्टसाठी भारतात परतला आहे. 16 ऑक्टोबर पासून न्यूझीलंड विरुद्ध पहिली टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांची ही टेस्ट सीरिज भारतातील बंगळुरू, पुणे आणि मुंबई येथील स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विराट कोहली गुरुवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर दाखल झाला. विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री उशिरा विराट कोहली मुंबई एअरपोर्टवर दाखल झाला. विराटला पाहताच पापाराझी आणि फॅन्सनी त्याचे फोटो काढण्यासाठी त्याच्या भोवती गराडा घातला. यावेळी आता खूप उशीर झाला आहे असं म्हणत विराट त्याच्या कारकडे जाऊ लागला. यावेळी एका चाहत्याने कोहलीला म्हंटले, 'विराट भाई BGT मध्ये आग लावायची आहे'. विराटच्या कानावर फक्त आग लावायचीये असे शब्द पडले. ते ऐकून विराट म्हणाला, 'कुठे लावायचीये?' तेव्हा चाहता म्हणाला, 'भाई BGT मध्ये (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी)'.  


पाहा व्हिडिओ : 



विराटने यावर मान डोलावून होकार दिला. नुकत्याच बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहलीने फलंदाजी करताना पहिल्या सामन्यात 23 तर दुसऱ्या सामन्यात 76 धावांची खेळी केली. आता 16 ऑक्टोबर पासून टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून येथे ते पाच सामन्यांची टेस्ट सीरिज बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. 


हेही वाचा : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर


 


भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट आणि टी 20 सीरिज : 


न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार असून यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज आणि तेवढ्याच सामन्यांची टी 20 सीरिज खेळण्यात येईल. 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पहिला सामना हा चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात खेळवला जाईल. तर तिसरा सामना हा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियमवर पार पडेल. तर टी 20 सिरीजचा पहिला सामना हा 18 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल.