बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर

Rohit Sharma unavailable BGT 2024:  टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल. 

पुजा पवार | Updated: Oct 11, 2024, 02:16 PM IST
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर  title=
( Photo Credit : Social Media )

Border Gavaskar Trophy 2024:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यात येणार असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल. ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 

पीटीआयने BCCI च्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 'सध्या अजूनही यात स्पष्टता आलेली नाही. असं समजतंय की रोहितने BCCI अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे की तो काही वैयक्तिक कारणामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात तो अनुपस्थितीत राहू शकतो. सीरिज सुरु होण्यापूर्वी जर वैयक्तिक समस्यांचे निराकरण झाले तर रोहित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5 सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. येत्या दिवसात अधिक माहिती समोर येईल'. 

कोण घेणार रोहित शर्माची जागा?

जर रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे बॉर्डर गावकर ट्रॉफीचे दोन सामने खेळू शकला नाही तर त्याची जागा अजिंक्य रहाणे किंवा अभिमन्यू ईश्वरन घेऊ शकतात. अभिमन्यू ईश्वरनने दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया बी टीमचे नेतृत्व केले होते. अशी माहिती मिळतेय की अभिमन्यू हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियातच असेल तो एका सिरीजमध्ये इंडिया ए टीमचे नेतृत्व करेल. अभिमन्यू ईश्वरन हा सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये दोन शतक ठोकली होती. तर इराणी कप 2024 मध्ये मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामन्यातही त्याने 191 धावांची खेळी केली होती. 

हेही वाचा : PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील

 

टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याला सुद्धा रोहितच्या अनुपस्थितीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या नेतृत्वात मुंबई टीमने इराणी ट्रॉफी जिंकली होती. यापूर्वी 2020 मध्ये विराट कोहली कर्णधार असताना तो काही वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध  टेस्ट सीरिजचा भाग नव्हता. तेव्हा अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली होती जी त्याने सक्षमपणे निभावली. आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. 

दुसरीकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा प्रश्न आहे तिथे रोहितच्या अनुपस्थितीत स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. याविषयी अधिक माहिती तेव्हाच मिळेल जेव्हा बीसीसीआय किंवा रोहित शर्मा याविषयी अधिकृतपणे भाष्य करतील.