WTC Final 2023: इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship) फायनल खेळवली जाणार आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( World Test Championship Final) फायनलसाठी खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या टेस्ट टीमला (Team India) इंग्लंडसाठी रवाना व्हावं लागणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला जाणारे खेळाडू आयपीएलच्या फायनल सामन्यासह अजून काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहे. 7 जून रोजी इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर हा फायनल सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांनीही त्यांच्या टीम्स जाहीर केल्या आहेत. 


23 मे रोजी टीम इंडिया होणार रवाना?


नुकंतच बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या या टीममध्ये अशा खेळाडूंचा समावेश आहेत, जे सध्या आयपीएलमध्ये खेळतायत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया 23 मे रोजी WTC Final साठी इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे. 


प्लेऑफचे खेळाडू नंतर जाणार इंग्लंडला?


आयपीएलचा फायनल सामना 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र क्रिकबझच्या माहितीनुसार, ज्या खेळाडूंचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आलाय, ते खेळाडू प्लेऑफच्या सामन्यानंतर इंग्लंडला रवाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित खेळाडूंना आयपीएलच्या सामन्यांना मुकावं लागणार नाहीये. 7 ते 11 जून यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. तर 23 मे पासून आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. 



प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेल्या 4 टीम्स सोडून 6 टीम्सचा आयपीएलचा प्रवास संपुष्टात येणार आहे. तर प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या 4 टीमच्या खेळाडूंव्यतिरिक्त WTC फायनलसाठी निवडलेले सर्व खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. अजून आयपीएलच्या पॉईंट्स टेबलचं गणित पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे कोणते खेळाडू नंतर रवाना होतील, याबाबत माहिती देता येणार नाही. 


WTC साठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकुर, मोहम्‍मद शमी, मोहम्‍मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जयदेव उनादकट आणि उमेश यादव.