नवी दिल्ली : सर्बियाची मॉडेल नतालीजा स्केकिकने एक धक्कादायक खुलासा केलाय. जगातील नंबर 1 च्या टेनिस स्टार नोवाक जोकोविच सोबत सेक्स टेप बनवण्यासाठी 50 लाख रुपये ऑफर केल्याचा आरोप तिने केलाय. इंस्टाग्राम स्टारने युरोपियन मॅग्झिन स्वेट एंड स्कॅंडलसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिलीय. नोवाकचे लग्न झालेले आयुष्य बर्बाद करणे हे या डिलचे उद्धीष्ट होते असे ती म्हणाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला एका व्यक्तीने संपर्क केला. मी त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत होती आणि खूपच प्रोफेशनल समजत होती. त्याने मला डेटसाठी विचारलं आणि मला वाटलं तो व्यवसायासंबंधी माझ्याशी बोलू इच्छित आहे. नोवाक याचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी हा कट असल्याचे माझ्या हळूहळू लक्षात आलं.


https://s3.india.com/wp-content/uploads/2021/03/novak-djokovic-Natalija-Scekic.jpg


मला नोवाक याला भुलवायचे आहे आणि अज्ञात स्थळी नेऊन त्याच्यासोबत टेप शूट करायची असल्याचे मला सांगण्यात आले. मला आधी वाटलं ती व्यक्ती मस्करी करतेय. पण तसं नव्हतं. या कामासाठी मला 50 हजार युरो आणि जगात कुठेही रिलॅक्स करण्याची ऑफर मला मिळू शकली असती.



त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मला राग आल्याचे मॉडेलने म्हटले. मला वाटतं होत त्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकू पण ते एक सार्वजनिक ठिकाणं होतं. त्याला पाहिजे तसं करणारी मुलगी मिळाली नसेल ही आशा मी करते असं ती म्हणाली.


नोवाक जगातील चांगल्या खेळाडुंमध्ये मोजला जातो. देशातील सर्वात मोठा ब्रॅण्ड एम्बासिडर आणि आदर्श फॅमिली मॅन आहे. दुसऱ्या कोणत्या महिलेने या कामासाठी पुढे येऊ नये असे तिने म्हटले. 


नोवाक आणि त्याची पत्नी जेलेनाचे लग्न 2014 मध्ये झाले होते. या दोघांच्या नात्याबद्दल देखील अफवा पसरल्या होत्या. आम्ही डिवॉर्स घेतोय हे ऐकणं लोकांसाठी महत्वाचं आहे पण तसं काही नाहीय. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि आमचं नात खूप मजबूत आहे असं त्याने सांगितलं.