olympics : ...आणि स्पर्धेदरम्यान चक्क स्वेटर विणू लागला `हा` सुवर्णपदक विजेता खेळाडू
तिथे एका सुवर्मपद विजेत्या खेळाडूनं असं काही केलं आहे, की....
olympics : दर दिवसाआड टोकियो ऑलिम्पिकमधून (olympics) काही रंजक वृत्त समोर येत आहेत. खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीपासून ते अगदी त्यांच्या विक्रमी कामगिरीपर्यंत, सारंकाही हल्लीच्या दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. एकिकडे भारतीय क्रीडारसिक हे देशाला आतातरी सुवर्णपदक मिळेल या आशेवर आहेत. तर, तिथे एका सुवर्णपदक विजेत्या खेळाडूनं असं काही केलं आहे, की साऱ्या क्रीडाविश्वाची आणि सोशल मीडियाची त्याच्यावरच नजर खिळली आहे.
ऐन ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, चक्क विणकाम (knitting) करणारा हा खेळाडू आहे तरी कोण, असंच सध्या सर्वत्र विचारलं जात आहे. हा खेळाडू आहे ब्रिटनचा सुवर्णपदक विजेता डायवर टॉम डेले (tom daley). एलजीबीटी कम्यूनिटीतील या खेळाडूनं वयाच्या 27 व्या वर्षी मॅटी लीसोबत हे पदक जिंकलं. यानंतर तो दुसरी मॅच पाहण्यासाठी स्टँडमध्ये बसला. तेव्हाच तो स्वेटर विणत असल्याचं दिसून आलं.
टॉम करत असणाऱ्या विणकामावर तिथं असणाऱ्या कॅमेऱ्यांची नजर पडली आणि साऱ्यांचंच लक्ष इथं वेधलं गेलं. बरं, असं काही करण्याची टॉमची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याला विणकाम करताना पाहिलं गेलं आहे. विणकामाकडे हा खेळाडू एका वेगळ्याच नजरेनं पाहतो. त्यानं सुवर्णपदक ठेवण्यासाठीसुद्धा एक विणकाम केलेला बटवा केला आहे. या संपूर्ण प्रवासाणध्ये मला शांत राहण्यास कशाची मदत झाली असेल तर ते आहे हे विणकाम. एक खेळाडू म्हणून टॉमचा हा अंदाज सध्या क्रीडा वर्तुळात कमालीचा गाजतोय.