मुंबई : राहुल द्रविडला भारतीय संघाची भिंत म्हणतात. तो सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची जागा संघात कोण घेणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तेव्हा चेतेश्वर पुजाराने ही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. पुजाराचा स्वभाव तसा शांत आहे. तो खूप कमी बोलतो पण जेव्हा तो स्वत:साठी मुलगी पाहायला गेला, तेव्हा तो दोन तासांपेक्षा जास्त वेळ बोलत राहिला. पूजा पाबरी असे त्या मुलीचे नाव आहे, जी आता पुजाराची पत्नी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघ्यांच्या लग्नाच्या आधीचा किस्सा सांगत पुजाराच्या पत्नीने क्रिकबझचा शो स्पाइसी पिचवर सांगितले, "आम्ही दोघेही चेतेश्वरच्या काकांच्या घरी भेटलो. आम्ही जेव्हा बोलायला एक खोलीत गेलो तेव्हा आम्ही दोन तास बोलत राहिलो. त्यावेळेला आमच्या घरचे विचार करत राहिले की, हे दोघे नक्की बोलतायत तरी काय? आम्ही इतका वेळ गप्पा मारत बसलो की, आम्हाला वेळ कसा गेला हे कळाले नाही. परंतु आमच्या कुटूंबातील सदस्य खोळंबले होते, कारण त्यांना देखील आमच्याशी बोलायचे होते."


पहिल्या भेटीत दोघांनाही एकमेकांना पसंती दर्शवली. त्यानंतर दोघांनीही 16 नोव्हेंबर 2012 रोजी लग्न केले. या दोघांना अदिती नावाची एक मुलगी आहे. पूजाने तिचे शालेय शिक्षण राजस्थानातील माउंट अबू येथील एका खासगी शाळेत केले आहे. त्यानंतर तिने एमबीए केले. एका मल्टीनेशनल कंपनीमध्ये ती एचआर हेड होती.



लग्नाआधी पूजाला पुजाराबद्दल फारशी माहिती नव्हती, पण लग्नानंतर ती बऱ्याचदा स्टेडियममध्ये आपल्या पतीला प्रोत्साहित करताना दिसली.