Royal Challengers Bangalore vs UP Warriorz :  युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात (RCB vs UP) वुमन्स प्रीमिअर लीगमधील 11 वा सामना (WPL 2024) खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीच्या पोरींनी बाजी मारली अन युपीला 23 धावांनी मात दिली. आरसीबीकडून सांगलीच्या स्मृती मानधनाने 80 धावांची खेळी केली तर पेरीने 58 धावा केल्या आहेत. आरसीबीने उभ्या केलेल्या 198 धावांसमोर युपीला 175 धावाच करता आल्या अन् आरसीबीने फायनलच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. अशातच आता या सामन्यात घेण्यात आलेल्या एका डीआरएसमुळे (WPL 2024 DRS Controversy) मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या. बंगळुरूला प्रत्युत्तर देताना यूपीच्या संघाला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला, जेव्हा किरण नवगिरे 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर चमारी अटापट्टूला मैदानात आली. सामन्याच्या सातव्या ओव्हरमध्ये चमारी अटापट्टूला तिसरा बॉल खेळता आला नाही. ती एका बॉलवर एलबीडब्ल्यू झाली. त्यावेळी आरसीबीकडून करण्यात आलेल्या अपीलवर तिला लेग बिफोर बाद जाहीर करण्यात आलं.


जॉर्जिया वेअरहॅम बॉलिंग करत असताना ओव्हरच्या तिसरा बॉल तिने लेग बॉल केला होता. मात्र, डीआरएसमध्ये बॉल गुगली पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे नक्कीच तांत्रिक चूक स्पष्टपणे दिसून आली आहे. अशातच आता अनेकांनी डीआरएस प्रकियेवर टीका देखील केली आहे. अशातच आता आकाश चोप्राने देखील व्हिडीओ शेअर करत डीआरएसवर प्रश्न उपस्थित केले आहेत.



दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन


यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन) : ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन) : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.