CPL 2023 Final: कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) च्या 2023 हंगामाचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने ट्रिबंगो नाइट रायडर्सचा (Trinbago Knight Riders vs Guyana Amazon Warriors) पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलं. 44 वर्षीय अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहिर (Imran Tahir) याने गयाना टीमचं कर्णधारपद भुषवलं होतं. विजयानंतर कॅप्टन इम्रान ताहीर भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी त्याने रविचंद्रन आश्विनचे (Ravichandran Ashwin) आभार मानले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरिबियन प्रीमियर लीगच्या फायनल (CPL 2023 Final) सामन्यात विजय मिळाल्यानंतर इम्रान ताहिरचा आनंद गगनात मावेना झाला. त्यावेळी त्याने आर आश्विनचे आभार मानले. सीझन सुरू होण्यापूर्वी माझ्यावर खूप दबाव होता. माझ्या नेतृत्वाखाली संघ कसा खेळेल? याची मला चिंता होती. मला कॅप्टन केल्यानंतर लोक माझी खिल्ली उडवायचे. माझ्यावर विनोद केले जात होते. मात्र, आर आश्विनने मला धीर दिला अन् त्याने मला सांगितलं की, तू हे करू शकतो. तू सीपीएल जिंकू शकतो, असं त्याने विश्वासने सांगितलं होतं, असं इम्रान ताहिर (Imran Tahir On Ravichandran Ashwin) म्हणाला आहे.


सीपीएल 2023 च्या फायनल सामना रंगतदार होईल, असं वाटत होतं. गुयाना अमेजन वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी त्रिबँगो नाइट रायडर्स संघाला अवघ्या 94 धावांत रोखलं. यामध्ये इम्रान ताहिर आणि गुडाकेश मोती यांनी अचूक गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक 4 विकेट घेत फलंदाजांची कंबर मोडली. त्यामुळे गुयानाचा विजय आणखी सोप्पा झाला.


आणखी वाचा - धक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर


दरम्यान, फायनल सामन्यात 95 धावांचा पाठलाग करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाची सुरूवात चांगली झाली नाही. 15 धावांवर कीमो पॉल बाद झाला अन् सामना फिरणार अशी शक्यता निर्माण झाली. त्यानंतर सैम अयुब आणि शाई होप यांनी आक्रमक अंदाजात फलंदाजी केली अन् 14 व्या ओव्हरमध्ये खेळ संपवला. सैम अयुब याने 14 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य गाठून गयानाला प्रथमच सीपीएल विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सैमने 41 बॉलमध्ये 52 धावांची शानदार नाबाद खेळी केली. त्याआधी 5 वेळा सीपीएलच्या फायनलमध्ये पोहोचून देखील गयानाचा संघ विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला होता. मात्र, आता त्यांनी नकोसा इतिहास पुसून काढला आहे.