Cricket News : मैदानात क्रिकेट सामने सुरु असताना खेळाडूंबरोबरच ड्रेसिंग रुममध्ये (Dressing Room) बसलेल्या सहखेळाडू, कोच (Coach) आणि सपोर्टिंग स्टापला (Supporting Staff) काही अटी लागू असतात. अटी मोडल्यास त्या व्यक्तीसह संपूर्ण संघाला त्याची शिक्षा भोगावी लागते. पण सध्या एका फोटोने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लाईव्ह सामना सुरु असताना एका संघाचा हेड कोच ड्रेसिंग रुममध्ये चक्क सिगरेट (Cigarette) पिताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या स्पर्धेतील घटना
ही घटना आहे बांगलादेश प्रिमिअर लीग (Bangladesh Premier League) स्पर्धेतील. तसं पाहिलं तर बांगलादेश प्रिमिअर लीग नेहमी वादात असते. आणि यावेळीही ही स्पर्धा याला अपवाद ठरलेली नाही. या स्पर्धेत एक लाजीरवाणी घटना घडली. ज्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. बांगलादेश प्रिमिअर क्रिकेट लीगमध्ये टायगर्सचे (Tigers) हेड कोच खालिद महमूद (Khaled Mahmud) हे लाईव्ह सामन्यात सिगरेट पिताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on Social Media) झाला आहे. 


टायगर्स आणि फॉर्च्यून बारिशल दरम्यान हा सामना खेळवला जात होता. या सामन्यावेळी बागंलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि टायगर्सचा हेड कोच खालिद महमूद ड्रेसिंग रुममध्ये सिगरेट पीत होता. खालिद महमूदची ही कृती आंतरराष्ट्रीय नियमांविरोधात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खालिद महमूदवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 



बांगलादेश लीग आणि वाद
बांगलादेश प्रिमिअर क्रिकेट लीग आणि वाद हे नातं तसंच जुनं आहे. याआधी स्पर्धेत खेळाडूं आपापसात भिडण्याचे प्रकार किंवा अंपायरशी वाद घालण्याचे प्रकार घडले आहेत. 


टायगर्सचा सामन्यात विजय
दरम्यान टायगर्स आणि फॉर्च्युन बारिशल यांच्यातील सामन्यात टायगर्सने बाजी मारली. पण विजयामुळे टायगर्सला फारसा फायदा झालेला नाही. कारण टायगर्स या स्पर्धेतून आधीच फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. टायगर्सला साखळी सामन्यातील 12 पैकी केवळ 3 सामने जिंकता आले आहेत.