भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत `या` जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
BCCI May Stop Tobacco Ads : भारतात खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यादरम्यान अनेकदा तंबाखू आणि गुटख्याच्या जाहीराती (Tobacco and Gutkha Advertisements) दाखवल्या जातात. या जाहीरातीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट बोर्डाला (BCCI) चांगली कमाई होते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडिअमवर (Stadium) तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीराती लावण्यावर आणि सामन्यादरम्यान टीव्हीवर दाखवण्यावर बंदी येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालया लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशन व्हायटल स्ट्रॅटेजीज यांनी मे महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार 2023 मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या एकूण जाहीरांतीमपैकी 41.3% जाहिराती क्रिकेट वर्ल्ड कपच्या 17 सामन्यांदरम्यान दाखवण्यात आल्या होत्या.
'लाइव्ह मिंट' च्या एका रिपोर्टनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला तंबाखूजन्य पदार्थांच्या किंवा गुटख्याच्या जाहीराती दाखवून नका असे आदेश देण्याबाबत विचार करतंय. विशेषत: ज्या जाहीरातीत सेलिब्रेटी या गोष्टींचं प्रमोशन करतायत अशा जाहीराती बंद करण्याची आरोग्य मंत्रालयाची प्राथमिकता आहे.
देशात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. स्टेडिअमध्ये किंवा टीव्हीवर देशात करोडो क्रिकेट चाहते सामना पाहात असतात. यादरम्यान तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या जाहीराती दाखवल्या जात आहेत. आणि सेलिब्रेटींकडून अशा गोष्टींचं समर्थन केलं जात आहे. त्यामुळे तरुण पिढीला तंबाखूजन्य पदार्थांसाठी अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहित केलं जातं. आरोग्य मंत्रालयाचे डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) BCCI ला पत्र लिहून कोणत्याही स्वरूपात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती दाखवणे थांबवण्याची विनंती करू शकतं.
वर्ल्ड कपदरम्यान जाहीराती
भारतात 2023 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्व कप खेळवण्यात आला होता. तब्बल दीड महिना ही स्पर्धा सुरु होती. त्यानंतर दोन महिने इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली. यादरम्यान अनेकवेळा तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याच्या जाहीराती दाखवण्यात आल्या. या जाहीरातींमुळे तरुण पिढीच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचं निरिक्षण आरोग्य विभागाने नोंदवलं आहे.