आयपीएलमधल्या `या` 7 गोलंदाजांना लागली लॉटरी, बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश
BCCI Contracts : आयपीएलमधल्या सात वेगवान गोलंदाजांना लॉटरी लागली आहे. भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅ्क्टच्या यादीत सात नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय.
BCCI Contracts : टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) 6 जुलैपासून झिम्बाब्वे दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया झिम्बाब्वेबरोबर पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टी20 वर्ल्ड कपमधल्या जवळपास सर्वच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये (IPL) दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली असून युवा फलंदाजी शुभमन गिलकडे या युवा टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
आयपीएल खेळाडूंना लॉटरी
या दौऱ्याआधी आयपीएलमधल्या सात खेळाडूंना लॉटरली लागली आहे. भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅ्क्टच्या (BCCI Fast Bowling Contract) यादीत सात नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची (Tushar Deshpande) टीम इंडियात वर्णी लागली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने त्याचा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे. तुषार देशपांडेने आयीएलबरोबरच स्थानिक क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केलीय. तुषार इंडिया ए साठी देखील खेळलाय. इंग्लंड ए विरुद्धच्या मालिकेत त्याने 15 विकेट घेतल्या. याशिवाय रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळतानाही त्याने दमदार कामिगरी केली आहे.
रिपोर्टनसुार तुषार देशपांडेबरोबर सात गोलंदाजांचा बॉलिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला आलाय. आयपीलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मयंक यादवचाही बॉलिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. मयंक यादवने लिस्ट ए सामन्यात 34 विकेट घेतल्यात. याशिवाय 14 टी20 सामन्यात त्याच्या नावावर 19 विकेट जमा आहेत. मयंक एक फर्स्ट क्लास सामनाही खेळलाय.
याशिवाय आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वत कवेरप्पा यांचा समावेश आहे.
टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा
दरम्यान, टीम इंडिया आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच T20 सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना 6 जुलैला तर दुसरा 7 जुलैला रंगणार आहे. भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तिसरा टी20 सामना 10 जुलै, चौथा टी20 सामना 13 जुलै आणि पाचवा आणि शेवटचा सामना 14 जुलैला रंगणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.