भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh Test) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जात आहे. या सामन्यात पहिली फलंदीज करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने (Team India) 376 धावा केल्या. याला उत्तर देताना फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांचं भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: कंबरडं मोडलं. या सामन्यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इतिहास रचला आहे. बुमराहने बांगलादेशविरुद्ध 3 विकेट घेतल्या. याबरोबरच बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहचे 400 विकेट 


भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या कसोटीत म्हणजे चेन्नई कसोटीतच बुमराह 400 विकेट टप्पा पूर्ण केलाय. जसप्रीत बुमराहने भारतासाठी आतांपर्यंत 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. तर 36 कसोटी सामन्यात 159 विकेट त्याच्या नावावर आहे. याशिवाय 89 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्या त्याने 149 विकेट घेतल्या आहेत.


बुमराहने मोडला हरभजनचा विक्रम


जसप्रीत बुमराहने भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रमही माोडला आहे. हरभजन सिंगने 237 डावात चारशे विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. तर हरभजनन सिंगने अवघ्या 227 डावात ही कामगिरी केली आहे. कमी डावात अशी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानावर आहे. अश्विनने 216 डावात 400 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. तर भारताचे दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी 220 डावात 400 विकेट घेतल्या होत्या.


वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या क्रमांकावर


टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सहाव्या क्रमांकावर आहे. कपिल देव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत कपिल देव यांनी 687 विकेट घेतल्या आहेत. तर झहीर खानने 610 विकेट घेतल्यात. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जवागल श्रीनाथच्या नावावर 551 विकेट जमा आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज


1. अनिल कुंबळे - 953 विकेट 2. रविचंद्रन अश्विन - 744 विकेट 3. हरभजन सिंह - 707 विकेट 4. कपिल देव - 687 विकेट 5. झहीर खान - 610 विकेट 6. रवींद्र जडेजा - 568 विकेट 7. जवागल श्रीनाथ - 551 विकेट 8. मोहम्मद शमी - 448 विकेट 9. ईशांत शर्मा - 434 विकेट 10. जसप्रीत बुमराह - 400