Harmanpreet Kaur Injured : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 ला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत भारताचे दोन ग्रुप स्टेज सामने झाले असून यात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर रविवारी पाकिस्तान विरुद्ध झालेला सामना टीम इंडियाने जिंकला. वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. 


मॅचमध्ये काय काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी टी 20 वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेज सामना पार पडला. यात पाकिस्तानने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी मागितली तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला नाकीनऊ आणत एका मागोमाग एक 8 विकेट्स घेऊन पाकिस्तानच्या टीमला 105 धावांवर रोखले. यात भारताची गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने 3 तर श्रीयंका पाटील हिने 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला विजयासाठी पाकिस्तानने 106 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यात भारताकडून सर्वाधिक धावा शेफाली वर्मा (32), जेमिमा रॉड्रिग्स (23), कॅप्टन हरमनप्रीत कौरने 23 धावांची खेळी केली. 


हेही वाचा : VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित


 


कॅप्टन हरमनप्रीत कौरला दुखापत : 


भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान टीम इंडियाचे विजयाचे आव्हान पूर्ण करताना हरमनप्रीतने 24 बॉलमध्ये 29 धावा केल्या. विजयासाठी अवघ्या २ धावा आवश्यक असताना कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या मानेला दुखापत झाली. दुखापतीनंतर अतिशय कळवळत आणि डोळ्यातून अश्रू ढाळत ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडली. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर कॅप्टन हरमनप्रीत ऐवजी वाईस कॅप्टन असणारी स्मृती मानधना ही पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलायला आली. स्मृती मानधनाने हरमनप्रीत विषयी बोलताना म्हंटले की, 'हरमनप्रीतच्या तब्येती विषयी आता काहीही बोलणं खूप लवकर होईल. टीम इंडियाची मेडिकल टीम तिच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे आणि योग्य उपचार करतेय, आशा आहे की ती लवकर बरी होईल'. 


हेही वाचा : कोण आहे टीम इंडियातला 'नौटंकीबाज'? रोहित, सूर्याने घेतलं 'या' खेळाडूचं नाव


 


टीम इंडियाचं टेन्शन वाढलं : 


टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध ग्रुप स्टेज सामन्यात जरी विजय मिळवला असला तरी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणं थोडं अवघडच आहे. न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवल्याने भारताचा नेटरन रेट -2.90 असा होता. तर पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यावर भारताचा नेटरन रेट -1.217 असाच आहे. भारताचे पुढील 2 सामने हे बलाढय ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सोबत आहेत. तेव्हा जर भारताला सेमी फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल तर हे दोन्ही त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. 


हरमनप्रीत कौर ही भारताची कॅप्टन असण्यासोबतच एक अनुभवी फलंदाज सुद्धा आहे. अनेक कठीण सामन्यात तिने मैदानात दमदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला. परंतु ऐन वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरला दुखापत झाल्याने ती पुढील सामने खेळणार की नाही यावर प्रश्न आहे. त्यामुळे कॅप्टनच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.