मुंबई : इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आणि काही मिनिटात त्याला मदत मिळाली. आयकर विभागाने काही मिनिटात पीटरसनला उत्तर दिलं. क्रिकेटर केविन पीटरसनचं पॅन कार्ड हरवल्याने त्याने मदत मागितली. कारण त्याला सोमवारी भारतात यायचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केविन पीटरसनने मंगळवारी पॅनकार्ड हरवल्याने हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ट्विट केले. पीटरसनने म्हटलं की, 'भारत कृपया मदद करावे. माझं पॅनकार्ड हरवलं आहे आणि सोमवारी मला भारतात यायचं आहे. पण यासाठी मला कार्ड लागणार आहे. कोणत्या व्यक्तीकडे पाठवलं जावू शकतं का? ज्याच्याकडून मी मदतीसाठी संपर्क करु शकतो? 


पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केले. पण केविन पीटरसनची समस्या दूर करण्यासाठी आयकर विभागाने लगेचच त्याला उत्तर दिलं. इनकम टॅक्स विभागाने ट्विट केलं की, 'आम्ही येथे तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहोत. जर तुमच्याकडे पॅनकार्डची माहिती असेल तर फिजिकल पॅनकार्ड मिळवण्यासाठी खालील लिंकवर जा.'



केविन पीटरसनने इनकम टॅक्स विभागाचे आभार व्यक्त करत धन्यवाद म्हटलं.