कोलंबो : श्रीलंकांमध्ये खेळवण्यात आलेली निदहास ट्रॉफी स्पर्धा सामन्यांपेक्षा इतर कारणांमुळे अधिक चर्चेत आली. या सीरिजमध्ये बांगलादेशचे खेळाडू त्यांच्या वर्तणुकीमुळे अधिक चर्चेत आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर त्यांनी नागिण डान्स करत श्रीलंकन खेळाडूंना चिडवले. तसेच अंपायरशी वादही घातला. त्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेटर्सनी ड्रेसिंग रुमची काचही तोडली. 


आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये ही घटना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यांच्या अखेरच्या षटकादरम्यान घडली. यावेळी श्रीलंकेला जिंकण्यासाठी १२ धावा हव्या होत्या. मैदानावर असलेल्या अंपायनरनी सलग दुसऱ्या बॉलला नोबॉल दिला. अंपायरच्या निर्णयामुळे वैतागलेल्या बांगलदेशच्या कर्णधार शाकीबने फलंदाजांना माघारी बोलावले. मात्र प्रशिक्षकांनी मध्यस्थी घेतल्याने सामना खेळवण्यात आला. यात श्रीलंकेचा पराभव झाला. 


या विजयानंतर ज्या पद्धतीने बांगलादेशच्या संघाने जल्लोष केला त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यांच्या ड्रेसिंग रुमची काचही तुटली. याप्रकरणी श्रीलंकन मीडियाने दावा केलाय की ड्रेसिंग रुमची काच बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने तोडली होती. या सामन्यानंतर बांगलादेशच्या संघाच्या ड्रेसिंग रुमची एक काच तुटल्याचा फोटो समोर आला होता. यानंतर हा वाद आणखीन वाढला.


श्रीलंकेच्या 'द आईलँड'च्या रिपोर्टनुसार, मॅच रेफ्री क्रिस ब्रॉडने काच तोडणाऱ्या व्यक्तीचे नाव जाणून घेण्यासाठी श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यानंतर कॅटरर्सशीही बातचीत केली होती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्येही अद्याप हे स्पष्ट झालेले नाहीये. या वर्तमानपत्रातील रिपोर्टनुसार वर्किंग स्टाफने या घटनेमागे बांगलादेशचा कर्णधार शाकीबचा हात असल्याचे म्हटलेय.