CSK IPL Schedule 2024: CSK चा पहिलाच आयपीएल सामना होमग्राउंडवर, इतर सामने कधी व कुठे? पूर्ण शेड्यूल वाचा
CSK IPL Schedule 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 17 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आलेले आहे. त्यानुसार महेंद्रसिंह धोनीच्या CSKचा पहिला सामना कधी व कुठे आहे, पहा चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल 2024 चे पूर्ण शेड्युल...
CSK IPL Schedule 2024: 2024इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे वेळापत्रकानुसार, मार्च 22 2024 मध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. चेन्नईतील चिंदबरम स्टेडियमवर आयपीलएच्या सतराव्या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना महेंद्रसिंग धोनी याच्या चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजेस बंगळुरू (RCB) यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे एकूण सामने किती आणि कुठे खेळवले जाणार याचे शेड्यूल जाणून घ्या.
22 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे शेड्युल समोर आले आहे. आयपीएल सुरू होण्याच्या बरोबर एक महिनाआधीच हे वेळापत्रक समोर आले आहे. सध्या जाहीर झालेले वेळापत्रकात फक्त 21 सामन्याची वेळ आणि ठिकाण देण्यात आली आहे. तर, इतर सामन्यांचे वेळापत्रक काहीच दिवसांत शेअर करण्यात येणार आहे.
IPL 2024 : आयपीएल 2024मध्ये Mumbai Indian चा पहिला सामना पाहा कधी?
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. 22 मार्च रोजी एम.ए. चिंदबरम स्टेटियम, चेन्नईत हा सामना होत आहे. सीएसकेचा पहिलाच सामना होमग्राउंडवर होणार आहे. त्यामुळं सीएसकेच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
आयपीएल 2024 चेन्नई सुपरकिंग्सचे वेळापत्रक
CSK vs Royal Challengers Bangalore - March 22 - Chennai - 7:30 PM
CSK vs Gujarat Titans - March 26 - Chennai - 7:30 PM
CSK vs Delhi Capitals - March 31 - Visakhapatnam - 7:30 PM
CSKvs Sunrisers Hyderabad - April 5 - Hyderabad - 7:30 PM
चेन्नईच्या संघात कोणते खेळाडू?
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, तुषार देशपांडे,शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, राजवर्धन हंगारेकर, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथीर्ना, अजिंक्य रहाणे, शेक रशीद, मिशेल सॅन्टर, समरजीत सिंह, निशांत संधू, प्रशांत सोलंकी, महेश टिकशाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकरे, समीर रिझवी, मुस्ताफीजुर रहेमान, अविनाश राव