पुणे : आयपीएल २०१८मध्ये चेन्नईच्या टीमनं आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण शनिवारी मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. याआधीच्या मॅचमध्ये चेन्नईच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा होता तो दीपक चहरचा. आयपीएलच्या या मोसमामध्ये चहर चेन्नईसाठी सगळ्यात मोठी शोध आहे. पण चेन्नईच्या टीमला मोठा झटका लागला आहे. दुखापत झाल्यामुळे चहरला टीमच्या बाहेर जावं लागलं आहे. दीपक चहर आता दोन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना चहरला मैदानाबाहेर जावं लागलं. चहरच्या मांड्यांच्या स्नायूंना दुखापत झाल्याची माहिती चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक चहरनं यंदाच्या मोसमात उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचमध्ये चहरनं ६ विकेट घेतल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चहरनं ४ ओव्हरमध्ये १५ रन देऊन ३ विकेट घेतल्या होत्या.


चेन्नईला दुखापतीचं ग्रहण


याआधी दुखापतीमुळे चेन्नईचे केदार जाधव आणि मिचेल सॅण्टनर संपूर्ण आयपीएल मुकणार आहेत. रैना आणि फॅप डुप्लेसिसही दुखापतीमुळे काही मॅच खेळू शकला नव्हता.