मुंबई: पहिल्या वन डे सामन्यादरम्यान टीम इंडियातील दोन खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आहे. हिटमॅन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इतकच नाही तर आता वन डे सीरिजनंतर दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2021च्या चौदाव्या हंगामासाठी खेळू शकणार नाही. संपूर्ण आयपीएल होईपर्यंत श्रेयस अय्यर खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 



बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर एक्स रे काढण्यात आला. त्यामध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस श्रेयसला क्रिकेट आणि मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. शस्त्रक्रियेबाबत अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र ती करावी लागली तर श्रेयस IPLचा संपूर्ण हंगाम बाहेर असणार आहे अशी माहिती देखील मिळाली आहे.


Ind vs Eng: रोहित आणि श्रेयसबाबत सस्पेन्स! 2 खेळाडूंना दुसऱ्या वन डेत मिळणार संधी?


वन डे सीरिजमधून देखील श्रेयस अय्यर बाहेर गेल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 26 आणि 28 मार्च रोजी उर्वरित भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा आणि तिसरा वन डे सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या वन डे सामन्यात 66 धावांनी भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला होता.