Ind vs Eng: रोहित आणि श्रेयसबाबत सस्पेन्स! 2 खेळाडूंना दुसऱ्या वन डेत मिळणार संधी?

दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाली

Updated: Mar 24, 2021, 04:22 PM IST
Ind vs Eng: रोहित आणि श्रेयसबाबत सस्पेन्स! 2 खेळाडूंना दुसऱ्या वन डेत मिळणार संधी? title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमधील पहिला सामना नुकताच पार पडला. 66 धावांनी टीम इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवला. ह्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच संघाला मोठा धक्काही बसला आहे. दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यामुळे दोघंही पुढचा सामना खेळणार का? याबाबत अद्यापही गुप्ताता आहे. 

पहिल्य़ा वन डे सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या हाताला आणि श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दोघंही उर्वरित दोन्ही सामन्यांमधून बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. असं असलं तरी दोघंही संघात परत येतील अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र याबाबत सध्यातरी सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

हिटमॅन रोहित ऐवजी शुभमन गिलला मिळणार संधी?
रोहित शर्मा जर इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळत नसेल तर शुभमन गिलला सलामीवीर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.  शुभमन गिलचा फॉर्म चांगला नसला तरी संघ व्यवस्थापन त्याला आणखी एक संधी देण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. शुभमन गिलने आतापर्यंत भारताकडून 3 वन डे सामने खेळले आहेत. या सामन्यामध्ये त्याने 49 धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यर ऐवजी सूर्यकुमारला संधी?
इंग्लंड विरुद्धच्या टी -२० मालिकेत सूर्यकुमार यादवने आपल्या भेदक फलंदाजीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याने कमी चेंडूद जास्त धावा भारतीय संघाला मिळवून दिल्या. श्रेयस अय्यर ऐवजी त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वन डे सामना पुण्यात 26 मार्च रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे.