मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी देखील आहे. असं म्हणतात की सिंह हा म्हातारा झाला तरी तो सिंहचं असतो तो शिकार करणं विसरत नाही. धोनीच्या बाबतीत देखील असंच म्हणावं लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या कामगिरीवर आजपर्यंत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण धोनीने वेळोवेळी आपल्या परफॉर्मेंसने अनेकांना उत्तर दिली आहेत. त्याला अनेकदा रिटायर होण्याचे सल्ले देखील मिळाले. धोनीची बिबट्याची धाव आणि स्टम्पिंग ही तर नेहमी चर्चेचा विषय असते. पण धोनी ओळखला जातो तो त्याच्या सिक्समुळे. धोनीने लगावलेले हे सिक्स दाखवून देईल की त्याच्यामध्ये अजून किती क्षमता आहे.  


धोनीने लगातार ३ जबरदस्त सिक्सर ठोकले. तमिळनाडु प्रीमियर लीगच्या  दूसऱ्या सीजनच्या शुभारंभात हे सिक्स ठोकले. धोनीचे हे सिक्स पाहून मैदानावर उपस्थित चाहते इतके खूश झाले की ते धोनी-धोनीचा आवाज मैदानावर घुमू लागला. 


पाहा व्हिडिओ