मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात धोनीच्या संघाने विजय मिळवला. ४ धावांनी धोनीच्या संघाने यात विजय साकारला. दरम्यान हैदराबादचे फॅन या विजयावर सवाल उपस्थित करतायत. त्यांच्या मते शेवटच्या ओव्हरमध्ये जर चांगली अंपायरिंग झाली असती तर निकाल काही वेगळा असता. याशिवाय या सामन्यात धोनीच्या विजयामागे आणखी एक कारण आहे. हे कारण म्हणजे चेन्नईचा क्रिकेटर कर्ण शर्मा. त्याने अशी फिल्डिंग केली की त्यामुळे हैदराबादला अप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या संघाने अंबाती रायडूच्या ७९ आणि सुरेश रैनाच्या ५४ धावांच्या जोरावर १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादच्या संघाला हे लक्ष्य गाठण्यात अपयश मिळाले. हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. दीपक चहरने तीन षटकांत १५ धावा देत १५ धावा केल्या. यावरुन हैदराबाद या सामन्यात विजय मिळवणार नाही असेच वाटत होते. मात्र केन विल्यमसन्सच्या खेळीमुळे हैदराबाद विजयाच्या जवळपास पोहोचला. 



कर्ण शर्माची बाऊंड्रीवर शानदार फिल्डिंग


हैदराबाद संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरला होता ३ ओव्हरमध्ये १२ धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. शार्दूल ठाकूरने चौथी ओव्हर सुरु केली. त्याच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसन्सने थर्डमॅनच्या दिशेने मारला. बॉल षटकारासाठी जात असतानाच बाऊंड्रीच्या दिशेला फिल्डिंग करत असलेल्या कर्ण शर्माने उडी मारत कॅच घेतला. कर्ण शर्माने सरळ सरळ संघासाठी १५ धावा वाचवल्या. 


२. अंपायरकडून शादूर्ल ठाकूरच्या बॉलला नोबॉल दिला


शार्दूल ठाकूरने केन विल्यमसन्सला टाकलेला चेंडू वादग्रस्त ठरला. केन विल्यमसन्सला टाकलेला फुलटॉस चेंडू अंपायरनी नोबॉल घोषित केला. मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की बॉल कमेवरुन वर गेलाय. क्रिकेटच्या नियमानुसार, कमरेच्या वरुन जाणाऱ्या फुलटॉस बॉलला नो बॉल घोषित केला जातो. तसेच फ्री हिट दिली जाते. दरम्यान, रविवारी असे घडले नाही आणि हैदराबादने हा सामना केवळ ४ धावांनी हरवला. खुद्द कमेंटेटर आकाश चोप्राने या बॉलला नो बॉल घोषित केले.