Asia Cup  2022 : आशिया कपच्या शेवटच्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये विराटने झंझावती शतक झळकवत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. अफगाणिस्तानने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र विराट आणि राहुलने निर्णय फोल ठरवत 212 धावा काढल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 111 धावा करू शकला. कालच्या सामन्यामध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानविरूद्ध दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत दोघांना संधी देण्यात आली. कीपर पंत होता आणि कार्तिकला बॅटिंगही आली नाही. बॅटिंग ना कीपिंग मिळालेल्या कार्तिकला 20 वं षटक देण्यात आलं. कार्तिकला गोलंदाजी करताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण 2004 साली पदार्पण केलेल्या कार्तिकने 18 वर्षामध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी केली. 


 



 



अफगाणिस्तानला 6 चेंडूंमध्ये 120 धावांची गरज होती त्यावेळी कार्तिक गोलंदाजीला आला. कारण 120 धावा 1 ओव्हरमध्ये करणं अशक्य होतं. अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झद्रानने पूर्ण ओव्हर खेळली, त्याने दोन षटकार आणि तीन दुहेरी धावा घेतल्या. कार्तिकने एकूण 18 धावा दिल्या. दिनेश कार्तिकने 50 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 592 धावा केल्या आहेत.