India vs Australia Test: भार आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्‍कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता आणि अवघ्या तिसऱ्या दिवशी हा सामना संपला. 9 विकेट्सने ऑस्ट्रेलियाच्या टीमने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याची अनेकांना माहितीच नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दोन चाहते सिक्युरीटी अधिकाऱ्यांची नजर चुकवून थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलेत. यावेळी त्यांनी पुजारासोबत सेल्फी देखील घेतला. मात्र ज्यावेळी ही गोष्ट सर्वांना समजली, त्यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी या जणांना अटक केली आहे. यानंतर स्टेडियममध्ये बॉम्ब निकामी पथक बोलवण्यात आलं आणि संपूर्ण ड्रेसिंग रूमची तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.


कधी घडली ही घटना?


गुरुवारी संध्याकाळी जवळपास 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्याचा तो दुसरा दिवस होता. यावेळी दुसऱ्या दिवसाचा खेळ जवळपास संपण्याच्या मार्गावर होता. त्याचवेळी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून दोन चाहते ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचले. इतकंच नाही तर हे दोघं खेळाडूपर्यंत देखील पोहोचले


पोसिसांनी केली कारवाई


चाहत्यांना ड्रेसिंगरूममध्ये घुसल्याचं पाहताच सुरक्षा रक्षक आणि एमपीसीएचे अधिकारी सतर्क झाले. यावेळी पोलिसांनी या दोन्ही चाहत्यांना अटक केली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बॉम्ब निकामी पथकद्वारे ड्रेसिंग रूमच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. 


तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय


तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.