मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. ड्युक बॉलनं हा सामना साउथेम्प्टन इथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी येत आहे. स्टार गोलंदाजाने क्रिकेटमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतका टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण आणि हा खेळाडू कोण आहे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याच्या निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याला सस्पेंड करण्यात आल्यानंतर ऑलीने क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला आहे. 


नेमकं काय प्रकरण? ऑलीला का सस्पेंड करण्यात आलं?


इंग्लंड क्रिकेट बोर्ड सध्या सर्व खेळाडूंच्या जुन्या ट्वीटवरून अॅक्शन घेत आहे. ऑली रॉबिन्सनने 7 ते 8 वर्षांपूर्वी विवादीत ट्विट केले होते. हे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल झाले. ज्यावेळी त्याला इंग्लंड विरुद्ध सीरिजसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली तेव्हा या ट्वीटवरून गदारोळ सुरू झाला. त्यामुळे आता इंग्लंड क्रिकेट बोर्डनं त्यांच्यावर कारवाई केली आहे. 


इयोन मॉर्गन आणि विल्यमसनवरही सावट?


इयोन मॉर्गन आणि केन विल्यिमसन यांचे जुने ट्वीट देखील समोर आले असून आता त्यांनाही सस्पेंड करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सगळ्या प्रकारामुळे इंग्लंडचे खेळाडू धास्तावले आहेत. ऑलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सस्पेंड झाल्यानंतर काहीकाळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


रॉबिन्सनची डेब्यूनंतर कामगिरी खूप चांगली होती. त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. आता प्रश्न हा आहे की तो डिप्रेशनमध्ये गेला आहे का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सस्पेंड केल्याचा धक्का त्याला पचवणं कठीण जात असल्यानं हा निर्णय घेतला असावा का? किती काळ तो क्रिकेटपासून दूर राहणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.