मुंबई: ज्या वयात खेळ आणि मजा मस्तीकडे तरुणाईचा कल असतो त्याच वयात या तरुण महिला क्रिकेटपटूनं आपलं ध्येय पूर्ण केलं. वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केलं. त्यानंतर पुढे 8 वर्षांनंतर वयाच्या 24 व्या वर्षात 2 वर्ल्डकप जिंकवून दिले आणि पुढच्या दोन वर्षात क्रिकेटमधून संन्यास देखील जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड महिला संघातील माजी क्रिकेटपटू इशा गुहा यांच्याबद्दल आज खास गोष्टी जाणून घेणार आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे. इशा गुहा यांचा जन्म 21 मे 1985 रोजी झाला. त्यांचे आई-वडील मूळचे बंगालचे रहिवासी पण 1970मध्ये ते इंग्लंडमध्ये आले. 


इशा गुहा यांनी वयाच्या 16 वर्षी 2001 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात पाऊल टाकलं. वुमन्स युरोपियन चॅम्पियनशिपसाठी त्या खेळल्या होत्या. त्यांनी आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. त्यांच्या गोलंदाजीची जगभरात चर्चा होऊ लागली. 2004 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 22 धावा देऊन 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.


2006 रोजी भारत विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये 5 आणि वन डेमध्ये 8 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. एशेज सीरिजमध्ये 100 धावा देऊन त्यांनी 9 विकेट्स काढल्या होत्या. एशेज सीरिज ही सर्वात उत्तम आणि अविस्मरणीय ठरली होती. इंग्लंड संघाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी मदत केली. 


 विश्वचषकातील तिची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती आणि तिने केवळ चार विकेट  घेतल्या. तिचा संघ विजय मिळवून दिला. यादरम्यान, ती आयसीसीच्या क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर पोहोचली. 


ईशा गुहा 2009 मध्ये वर्ल्ड टी -20 जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्य देखील होती. त्यांनी वयाच्या 26 वर्षी तिने क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्यांनी पुढे कॉमेंटेटर म्हणून देखील काम केलं आणि तिथेही आपलं नाव उज्ज्वल केलं.