मुंबई : विक्रमी गोलचा मानकरी अशी ओळख असलेला इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनी याने फुटबॉलला अलविदा म्हटले आहे. रूनी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा बुधवारी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड क्वालिफायर्ससाठी संघ घोषित होण्यापूर्वीच रूनीने निवृत्तीची घोषणा केली. आपल्या निवृत्तीबाबत बोलताना रूनीने म्हटले, 'जेव्हा जेव्हा संघामध्ये माझी निवड झाली तो क्षण माझ्यासाठी नियतीने दिलेला कौलच राहिला आहे. मात्र, आता मला वाटते की, माझी परतण्याची वेळ झाली आहे.' विक्रमी गोलचा मानकरी अशी रूनीची ओळख आहे.


मॅंचेस्टर युनायडेटचा माजी कर्णधार राहिलेल्या रूनीने ११९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५३ गोल केले आहेत. इंग्लडकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरण्याचा विक्रमही रूनीच्याच नावावर आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या युरोपियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या कारकिर्दीतील २००वा गोल केला. हा विक्रम करणारा रूनी हा जगातला दुसरा फुटबॉलपटू आहे. पण, हळहळ अशी की, हा विक्रम केल्यावर दोनच दिवसांत त्याने निवृत्तीची घोषणा केली.


२००३मध्ये इंग्लंडकडून खेळताना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला त्याचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाशी होता. त्या सामन्यात त्याने इग्लंडला ३-१ असा विजय मिळवून दिला होता. वयाच्या १८ व्या वर्षी तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी टूर्नामेंट २००४मध्ये खेळला. तर, आपल्या कारकिर्दीतला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना तो गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात खेळला. हा सामना स्कॉटलंडविरूद्ध होता. या सामन्यात त्याने ३-० अशा फरकाने संघाला विजय मिळवून दिला. २००वा गोल केल्यावर त्याने फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.