SunRisers Hyderabad Captain Pat Cummins : सर्वांना उत्सुकता असेल्या सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) संघाने मोठी खांदेपालट केली आहे. आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) हैदराबादने कॅप्टन्सी सोपवली आहे. तर एडन मार्करम (Aiden Markram) याची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या किमतीत विकला गेल्याने कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निष्ठेला मोल नाही?


ऍडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी लीगच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने डरबन सुपर जायंट्सचा 89 धावांनी पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला होता. काव्या मारनच्या टीमने सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी लीग ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. मात्र, आता ज्या कॅप्टनने दोनदा ट्रॉफी उचलण्याची संधी दिली, त्याच कॅप्टन ऍडन मार्करमला डच्चू देण्यात आला आहे. अशातच आता निष्ठेला मोल नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.


मार्करमला कॅप्टन्सीवरून का काढलं?


ऑक्शननंतर आता हैदरबादचा यंदाचा संघ पाहिला तर खुद्द एडन मार्कराम यालाच प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांना संघात स्थान देयचं असेल तर मार्करमला बाहेर बसावं लागेल. त्याचबरोबर मागील आयपीएल हंगामात मार्करम याला विजय मिळवता आले नाहीत. हैदराबादचा संघ मागील हंगामात 10 व्या स्थानी होता. त्यामुळे फॅन्सचा हिरमोड झाला होता. अशातच आता वर्ल्ड कप विनर कॅप्टनकडे संघाची जबाबदारी दिल्याने हैदराबादचा संघ चेन्नई आणि मुंबईला देखील धूळ चारू शकतो. गोलंदाज डेल स्टेनच्या जागी न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर जेम्स फ्रँकलिन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याने मार्करमची कॅप्टन्सी धोक्यात आली होती. अखेर मॅनेजमेंटने पॅट कमिन्स संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.


सनरायझर्स हैदराबादचा संघ -


अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नायक. नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.


हैदराबादचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक


हैदरबाद विरुद्ध कोलकाता, 23 मार्च .
हैदरबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च.
हैदरबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च.
हैदरबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल.