Brazil vs South Korea Fifa World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेली फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर सुपर 16 फेरीचे सामने सुरु आहेत. या फेरीतून नेदरलँड (Netherland), अर्जेंटिना (Argentina), क्रोएशिया (Croatia), ब्राझील (Brazil), इंग्लंड (England) आणि फ्रान्स (France) या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तर मोरोक्को (Morocco), स्पेन (Spain), पोर्तुगाल (Portugal) आणि स्वित्झर्लंड (Switzerland) संघातून दोन संघ उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी सामना खेळणार आहेत. तत्पूर्वी ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया (Brazil Vs South Korea) या दोन संघात रंगलेली स्पर्धा चर्चेत आहेत. ब्राझीलने हा सामना 4-1 ने जिंकला. या स्पर्धेत ब्राझीलच्या के रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. गोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


ब्राझीलचा डाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलच्या संघाने डावाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण कोरियावर पकड ठेवली होती. नेमार आणि विनीशियस ज्युनिअरनं गोल मारल्यानंतर 2-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर 29 व्या मिनिटावर रिचार्लिसननं सेट पीसकडून जबरदस्त गोल केला. रिचार्लिसनकडे फुटबॉल आल्यानंतर त्याला चारही बाजूनं दक्षिण कोरियन खेळाडूंनी घेरलं. त्यानंतर त्यांनी चार वेळा डोक्याने फुटबॉल वर उडवला आणि दुसऱ्या खेळाडूकडे पास केला. त्यानंतर पुन्हा फुटबॉल आपल्याकडे येताच जबरदस्त गोल केला.



वाचा बातमी- FIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते


उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाशी सामना


उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. सुपर 16 फेरीत क्रोएशियाने जापानचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-1 ने पराभव केला. असं असलं तरी उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचं पारडं जड मानलं जात आहे. ब्राझीलने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. यंदाही ब्राझील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.