FIFA World Cup 2022 prize money : फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या दरम्यान फिफा वर्ल्ड कपची प्राईज मनी समोर आली आहे. फिफाच्या या प्राईज मनीत आणि टी 20 वर्ल्ड कपच्या प्राईज मनीत किती फरक असतो, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिफा वर्ल्ड कपला (FIFA World Cup 2022) येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात आशिया खंडातील 6 संघ असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेत्या आणि उपविजेत्या संघांसह इतर सर्व संघांना बक्षीस रक्कम वितरित करण्यात आली आहे. पण फिफा वर्ल्ड कपमध्ये आता जेतेपद आणि बक्षिसाच्या रकमेसाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.


आयसीसीचं प्राईज मनी? 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने T20 वर्ल्ड कप (T20 world Cup) स्पर्धेसाठी एकूण $5.6 दशलक्ष (45.14 कोटी रुपये) ची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी सर्व 16 संघांमध्ये वेगळ्या पद्धतीने वाटली गेली. अंतिम फेरीच्या चॅम्पियन संघाला सुमारे 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला सुमारे 6.44  कोटी रुपये मिळाले.


FIFA ची प्राईज मनी?  


फिफा वर्ल्ड कपसाठी (FIFA World Cup 2022) बक्षिसाची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस रक्कम $440 दशलक्ष (सुमारे 3 हजार 585 कोटी रुपये) निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 42 मिलियन डॉलर (सुमारे 342 कोटी रुपये) मिळतील. मागील 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 4 दशलक्ष डॉलर्स जास्त आहे.


IPL विजेत्यापेक्षा कमी बक्षिस रक्कम


T20 विश्वचषक (T20 world Cup) जिंकणाऱ्या संघाला केवळ फिफा विश्वचषकच नव्हे तर इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चॅम्पियन संघापेक्षाही कमी रक्कम मिळते. आयपीएल 2022 चा हंगाम जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळाले. अशा परिस्थितीत वर्ल्ड कप चॅम्पियनला आयपीएलपेक्षा 7 कोटी रुपये कमी मिळाले आहेत.


प्राईज मनीत किती फरत असतो? 


क्रिकेट आणि फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या दोन्ही संघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान दोन्ही विश्वचषकांच्या चॅम्पियन संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेत जवळपास 26 पट फरक आहे. म्हणजेच T20 विश्वचषक (T20 world Cup) जिंकणाऱ्या संघापेक्षा FIFA विश्वचषक विजेत्या संघाला 26 पट अधिक रक्कम मिळते. 


दरम्यान क्रिकेटचा कितीही मोठा चाहता वर्ग असला तरी कमाईच्या बाबतीत फुटबॉलच (Football) खुप पुढे आहे.