नवी दिल्ली : जर कोणाला दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्रामच्या कोणत्याही क्रिकेटर विषयी माहिती हवी असायची तर ते केके तिवारी यांना फोन करत असतं. कानपूरमध्ये क्रिकेट खेळून 1992 मध्ये दिल्लीत नोकरीसाठी आले. केके फिरोज शाह कोटला मैदानात पोहोचले तर नोकरी सोडून तेथेच राहिले. फिरोज शाह कोटला मैदानाचं नाव अरुण जेटली स्टेडियम झालं. पण केके दिल्ली क्रिकेटचे हंसमुख आणि मदत करणारे चेहरा बनले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल सामन्यांमध्ये अंपायरिंग शिवाय कोर्स पास करणारे बीसीसीआयचे स्कोरर बनले. 27 एप्रिल रोजी त्यांना एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले. दिल्ली आणि जिला क्रिकेट संघ (डीडीसीए) चे कर्मचारी, पदाधिकारी, क्लबचे सदस्य आणि क्रिकेटर या शिवाय क्रीडा पत्रकार देखील त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत होते. दिल्ली क्रिकेट त्यांच्या शिवाय अपूर्ण होतं.


शुक्रवारी वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली, पूर्व बीसीसीआयचे अध्यक्ष सीके खन्ना, डीसीसीए सचिव विनोद तिहारा, निदेशक दिनेश शर्मा आणि सभी क्रिकेट क्लब यांनी यावर दु:ख व्यक्त केलं. 


केके तिवारी आता या जगात नाहीत. मीडिया बॉक्समध्ये त्यांचा आवाज कधी ऐकायला येणार नाही. त्यांच्या कुटुंबात पत्नी, 2 मुली आणि मुलगा आहे.