Baba Siddiqui Death :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यासोबत ही घटना घडली तेव्हा ते त्यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसरा साजरा करत होते. बाबा सिद्दीकी हे राजकारणात असले तरी त्यांचे बॉलिवूडच्या लोकांसोबत खास संबंध होते. दरवर्षी त्यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने सेलिब्रिटी उपस्थित राहायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यमुळे अनेक लोकांना धक्का बसला. भारतीय पुरुष संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याने बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एक भावुक पोस्ट लिहिली. युवराज सिंहने रात्री दोन वाजता सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली असून यात म्हंटले, 'बाबा  सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आणि खूप दुःख झाले. एक सच्चा नेता ज्याने लोकांसाठी अथक परिश्रम केले, त्यांचा प्रामाणिकपणा आणि मोठ्या मनाचा स्वभाव त्यांच्या ओळखीच्या सर्वांच्या स्मरणात राहील. या अविस्मरणीय कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो'.



बॉलिवूड सोबत खास कनेक्शन : 


बाबा सिद्दीकी राजकीय क्षेत्रात जास्त सक्रिय असले तरी त्यांचं बॉलिवूड सोबत खास कनेक्शन होतं. खास करून सलमान खान, शाहरुख खान यांच्या सोबत त्यांची खास मैत्री होती. बाबा सिद्दीकी दरवर्षी ईदच्या निमित्ताने बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित करायचे. त्यांच्या इफ्तार पार्टीची बरीच चर्चा व्हायची. शाहरुख आणि सलमान यांच्यातील वाद मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे मानले जाते.


हेही वाचा : IND VS BAN : टीम इंडियाची रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच, 461 धावा, 69 बाउंड्री, 22 सिक्स आणि 40 बॉलमध्ये सेंच्युरी...


चार राज्यांच्या पोलिसांकडून तपास सुरू: 


बाबा सिद्धीकी यांच्यावर तीन जणांनी गोळ्या झाडल्या. तीन पैकी एका दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यातून आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांसोबतच दिल्ली पोलिस, यूपीएसटीएफ आणि हरियाणा पुलिसांचे सीआईए पथक आरोपींचा शोध घेत आहेत.