Gautam Gambhir Ajit Agarkar T20I Captaincy Move: भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या निवड समितीने गुरुवारी एकदिवसीय संघ आणि टी-20 सामन्यांसाठीचा संघ अशा दोन वेगळ्या संघाची घोषणा केली. 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या मालिकेपासून गौतम गंभीर आपल्या प्रशिक्षपदाचा श्रीगणेशा करणार आहे. गंभीरने प्रशिक्षक म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतरचा भारतीय क्रिकेटला कलाटणी देऊ शकतो असा सर्वात चर्चेतील निर्णय घेतला आहे. हा निर्णयमध्ये टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आल आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याकडे त्याचा वारस म्हणून पाहिलं जात होतं. मात्र गंभीरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.


हार्दिक होता उपकर्णधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर भारतीय संघाने 29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकला त्यावेळी कर्णधारपद रोहितकडे तर उपकर्णधारपद हार्दिककडे होते. रोहितने फायनलमधील विजयानंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर इथून पुढला कारभार पांड्या संभाळणार असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 2026 चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन नेतृत्व सूर्यकुमारकडे सोपवलं. हा पुढला वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या आयोजित करणार आहे. 


गुजरातचं नाव घेतलं


मात्र निवड समितीच्या या निर्णयावर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ चांगलाच संतापला आहे. एकेकाळी गौतम गंभीर आणि अजित आगरकरबरोबर एकाच संघातून खेळलेल्या कैफनं हार्दिककडे नेतृत्व न सोपवण्याच्या निर्णय़ावरुन टीका केली आहे. संघ व्यवस्थापनाने कर्णधार म्हणून हार्दिकच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. मागील काही वर्षात टी-20 मध्ये हार्दिकने केलेलं टीम इंडियाचं नेतृत्व पाहता त्याच्या पाठीशी संघ व्यवस्थापनाने उभं राहून त्यालाच कर्णधारपदाची जबाबदारी सोपवायला हवी होती.


नक्की वाचा >> अजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेत


हार्दिकचा टी-20 मधील अनुभव नजरेआड घालता येणार नाही असंही कैफने म्हटलं आहे. आयपीएलमध्ये हार्दिकने गुजरात टायटन्सच्या संघाला पहिल्या दोन पर्वांपैकी एक पर्व जिंकवून देत दुसऱ्या पर्वाच्या फायनलपर्यंत संघाला नेलेलं हे विसरता कामा नये असंही कैफ म्हणाला आहे. हार्दिकच्या पाठीशी गुजरातचं नेतृव करण्याचा अनुभव आहे. कर्णधार म्हणून हार्दिक हा चुकीची निवड होती असं आपल्याला वाटत नसल्याचंही या माजी क्रिकेटपटूने स्पष्ट केलं आहे.


नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'


हार्दिकच्या पाठीशी...


"हार्दिकने गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं आहे. दोन वर्ष त्याने त्या संघाचं नेतृ्त्व करत पहिल्याच वर्षी तो संघाला अंतिम सामन्यात घेऊन गेला. हार्दिकला टी-20 संघाचं नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे. तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा उपकर्णधार होता. आता नवीन प्रशिक्षक आल्याने नवीन नियोजन केलं जाईल. सूर्यकुमार सुद्धा उत्तम खेळाडू आहे. तो अनेक वर्षांपासून खेळतोय. तो टी-20 मधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मला अपेक्षा आहे की तो कर्णधारपदाची जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडेल. मात्र मला वाटतं की त्यांनी हार्दिकच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं," असं कैफने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटलं. 


नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं


ही काही छोटी बाब नाही


"गंभीर हा अनुभवी कर्णधार आणि प्रशिक्षक आहे. त्याला क्रिकेट उत्तम पद्धतीने समजतं. मात्र मला वाटतं हार्दिकने असं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही की त्याला कर्णधारपद नाकारण्यात यावं," असंही कैफ म्हणाला. 2024 चं आयपीएलचं पर्व वगळलं तर हार्दिकने कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली असून भारतीय संघाचं त्याने 3 एकदिवसीय सामने आणि 16 टी-20 मध्ये नेतृत्व केलं आहे. "त्याला अनुभव आहे. त्याने आयपीएल संघाचं नेतृत्व केलं असून नव्या संघाला त्याने ट्रॉफी मिळवून दिली आहे. त्याने नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊ केलेली ही कामगिरी फार मोठी आहे. अगदी शून्यातून त्याने टायटन्सला आयपीएल जिंकवून दिलं आहे. ही काही छोटी बाब नाही. मला वाटतं तो कर्णधार म्हणून पात्र होता. आता पाहूयात पुढे काय होतं," असंही कैफ म्हणाला आहे.