Gautam Gambhir Give Nicknames To Indian Cricketers : भारतीय क्रिकेट संघाचा हेडकोच असलेला गौतम गंभीर अनेक कारणांमुळे चर्चेत येत असतो. राहुल द्रविड टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाच्या हेड कोच पदावरून दूर झाले. त्यानंतर बीसीसीआयने हेड कोच म्हणून गौतम गंभीरची निवड केली. सध्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात गंभीरने टीम इंडियातील अनेक आजी माजी खेळाडूंना टोपणनावं दिली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पोर्ट्स प्रेझेंटर शेफाली बग्गा हिने माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि शिखर धवन यांची मुलाखत घेतली. यावेळी तिने टीम इंडियाच्या क्रिकेटर्ससाठी कोणती टोपणनावं निवडाल असा खेळ खेळला. गौतम गंभीरला विचारण्यात आलं की त्याला दबंग हे नाव कोणाला द्यायचंय तेव्हा गंभीरने सचिन तेंडुलकरला हे नाव दिलं. तर गंभीरने युवराज सिंहला 'बादशाह', विराट कोहलीला 'शहंशाह' असे म्हंटले. तर जसप्रीत बुमराहला त्याने 'खिलाडी' असे नाव दिले.  यासोबतच त्याने म्हंटले की, 'खिलाडी' हा सर्वात महत्वाचा आहे. 


हेही वाचा : तुला एवढा राग का येतो? व्हायरल गोल्ड मेडलिस्टला मोदींनी विचारल्यावर म्हणाला...


 गौतम गंभीरने 'अँग्री यंगमॅन' हे नाव स्वतःला दिले. गंभीरने माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'टायगर' हे टोपणनाव दिले तर राहुल द्रविडला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' हे नाव दिले. तसेच शिखर धवनला 'गब्बर' असे नाव दिले. 



हेही वाचा :  14 सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, कधी कुठे पाहाल Live?


भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन याला सुद्धा शेफालीने टीम इंडियाच्या क्रिकेटर्सला टोपणनावं देण्यास सांगितली होती. तेव्हा 'बादशाह' या टायटलसाठी शेखरने विराटची निवड केली. तर 'अँग्री यंग मॅन' हे टोपणनाव मोहम्मद सिराज याला दिले. तसेच हार्दिक पंड्याला शिखरने 'दबंग' तर शुभमन गिलला 'खिलाडी' हे टायटल दिले.