ग्लेन मॅक्सवेलने वीरेंद्र सेहवागवर केला खळबळजनक आरोप, क्रिकेट विश्वात उडाली खळबळ
Maxwell on Sehwag: मॅक्सवेलने आपल्या `द शोमन` या पुस्तकात अनेक गुपिते उघड केली आहेत. याच पुस्तकात त्याने सेहवागवरही भाष्य केले आहे.
Glenn Maxwell on Virender Sehwag: वीरेंद्र सेहवाग आणि ग्लेन मॅक्सवेल हे क्रिकेट जगतातील दोन सर्वात उत्तम फलंदाज आहेत. हे दोन्ही दिगज्ज खेळाडू सध्या चर्चेत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज मॅक्सवेलने टीम इंडियाच्या माजी सलामीवीरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मॅक्सवेलच्या या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. मॅक्सवेलने त्याच्या 'द शोमन' या पुस्तकात अनेक रहस्ये उघड केली आहेत. त्याने भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागवर भाष्य केले आहे.
काय आरोप केला आहे?
मॅक्सवेल आणि सेहवाग आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (आता किंग्स इलेव्हन पंजाब) मध्ये एकत्र खेळले आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मॅक्सवेलने त्या काळातील वीरेंद्र सेहवागच्या कृतीचा पर्दाफाश केला आहे. त्याने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यावेळी सेहवाग एकटाच संघाचे नेतृत्व करायचा आणि आपली दादागिरी दाखवायचा. मॅक्सवेलने पुढे लिहिले की, सेहवागच्या या कृतीमुळे तो चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याने लिहले आहे की वीरेंद्र सेहवागच्या वागण्याने तो इतका निराश झाला आहे की तो पुन्हा कधीही माजी भारतीय फलंदाजाशी बोलला नाही.
काय लिहले आहे पुस्तकात?
मॅक्सवेलने आपल्या ‘द शोमन’ या पुस्तकात लिहिले आहे की, "वर्ष 2017 मध्ये आमचे प्रशिक्षक जे अरुणकुमार यांनी त्यांच्या पहिल्याच सत्रात स्पष्ट केले होते की, ते केवळ नावापुरतेच प्रशिक्षक आहेत आणि सेहवाग सर्व काही हाताळत आहे. त्यावेळी पडद्यामागच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण, वैयक्तिकरित्या, माझे प्रशिक्षक आणि खेळाडू माझ्याकडे आले आणि काय चालले आहे ते विचारले आणि मला त्यांना सरळ उत्तरे देणे कठीण झाले."
संघ निवडीबद्दलचा आरोप
ऑस्ट्रेलियन फलंदाजाने पुढे लिहिले, “जेव्हा संघ निवडीचा प्रश्न आला, तेव्हा मला वाटले की प्रशिक्षकांना व्हॉट्सॲप ग्रुप करून एकत्र आणणे चांगले होईल, जेणेकरून आम्ही आमचे निर्णय घेऊ शकू. सर्वांनी हे मान्य केले. परंतु वीरेंद्र सेहवाग सोडता सगळ्यांनी आपापल्या टीम्स शेअर केल्या. पण त्यानंतर त्याने प्लेइंग-11 निवडणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही अजूनही मैदानावर आणि मैदानाबाहेर हरत होतो, पण तरीही सेहवागने एकापेक्षा जास्त वेळा आवश्यक नसलेले निर्णय घेतले. संघात राजकारण करून त्यांनी माझी व्हॉट्सॲप ग्रुपमधून हकालपट्टी केली होती.
मॅक्सवेलचे आयपीएलमध्ये पदार्पण
मॅक्सवेलने आयपीएल 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना या लीगमध्ये पदार्पण केले. पण दोन हंगामांनंतर, तो 2014 मध्ये पंजाब किंग्जमध्ये गेला आणि 2017 पर्यंत त्या संघात होता.