GT vs KKR, IPL 2023: यशाची घोडदौड सुरूच ठेवलेल्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टायटन्सने गेल्या मोसमात केकेआर विरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा निश्चय करून कोलकाताचा (GT vs KKR) संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये चालू आठवड्यात पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ फलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर खेळपट्टी पाहता टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करणं पसंत करेल. गेल्या सामन्यात केकेआरने वेंकटेश अय्यरला कायम ठेवण्याची पसंती दिली होती. त्यामुळे आता कोलकाता रणनितीमध्ये बदल करणार का? असा सवाल विचारला जात आहे.


आणखी वाचा - MI vs CSK: ना सूर्या चालेना, ना ग्रीन; दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन Rohit Sharma ची वॉर्निंग, म्हणाला...


मनदीप सिंगने गेल्या मोसमात दोन गेममध्ये 2 आणि 0 धावा केल्या होत्या. त्यामुळे यंदा त्याला संधी मिळेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) केकेआर विरुद्ध 61 च्या सरासरीने 366 धावा केल्या आहेत. मात्र, आजच्या सामन्यात पांड्य़ा खेळणार नाही.


कसा असेल KKR चा संघ? (Probable XI)


रहमानउल्ला गुरबाज (WC), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती



कसा असेल GT चा संघ? (Probable XI)


ऋद्धिमान साहा (WC), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान (C), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल