India vs England Test Series : मागील तीन वनडे वर्ल्ड कपमध्ये धुंवाधार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammed Shami) अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित करण्यात आलंय. मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारत सरकारने सन्मानित केलं आहे. अशातच आता अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर त्याने फिटनेसवर आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर मोठं वक्तव्य केलं आहे. (Mohammed Shami big statement On availability for T20 World Cup 2024 )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला मोहम्मद शमी?


मोहम्मद शमी मैदानात पुन्हा कधी पहायला मिळणार? असा सवाल विचारला गेला. तेव्हा, 'मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढं मी मैदानात पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. आता याला किती वेळ लागेल हे पहावं लागेल, असं मोहम्मद शमी म्हणाला आहे. दुखापत तर आहेच पण रिहॅबिलिटेशनची परिस्थिती पण नाहीये. त्यामुळे डोक्यात कोणताच डाऊट असायला नको. टेस्टचा फॉरमॅट एक खुप लांबलचक असतो. त्यामुळे आपल्याला वाटत नाही की आपण कोणत्याही डाऊटशिवाय मॅच खेळावी. मला ते आवडतही नाही, माझ्या डोक्यात गोष्ट क्लियर असावी लागते. माझ्या डोक्यात कोणताच डाऊट असायला नको, असं मला वाटतं', म्हणत मोहम्मद शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


T-20 वर्ल्ड कप खेळणार का?


'जेव्हा आपण टी-ट्वेंटी फॉरमॅटवर बोलतो, तेव्हा मलाच समजत नाही की मी त्या सीनमध्ये आहे की नाही. पण एक गोष्ट आहे की, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी तुमच्याकडे आयपीएल खेळायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे चांगली संधी आहे. वर्ल्ड कपपूर्वी गोलंदाजालाचा चांगल्या रिदमची गरज असते. त्यामुळे तुम्ही जर आयपीएलमध्ये रिदम पकडून चांगली कामगिरी केली तर तुम्हाला पुढे चमकदार कामगिरी करता येईल. मात्र, वर्ल्ड कपपूर्वी चांगली लय भेटल्यानंतर टीम मॅनेजमेंटवर संपूर्ण कारभार डिपेंड आहे. पण मी तयार आहे', असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.


आणखी वाचा - 'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...'


दरम्यान, बॅटर्स तुम्हाला सामना जिंकवतात पण बॉलर्स तुम्हाला टुर्नामेंट्स जिंकवून देतात, असं म्हटलं जातं. मोहम्मद शमीने आपल्या चमकदार कामगिरीने टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये नेहमी विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं आहे. मागील तीन वर्ल्ड कपमधील 18 सामन्यात तब्बल 55 विकेट्स घेऊन मोहम्मद शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. याचीच दखल घेत भारत सरकारने मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.