'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...'

Mohammed Shami On Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे, असं म्हणत मोहम्मद शमीला शब्द अनावर झाले. मोहम्मद शमीने त्यावेळी दुखापतीवर (Mohammed Shami On injury Update) देखील भाष्य केलं.

सौरभ तळेकर | Updated: Jan 8, 2024, 11:12 PM IST
'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...' title=
Mohammed Shami happy to have been nominated For Arjuna Award

Mohammed Shami On injury Update : वर्ल्ड कपमध्ये धुंवाधार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammed Shami) भारत सरकारने मोठं गिफ्ट दिलंय. मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) खेळाडूंना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतील. अशातच आता वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमी याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल उत्कृष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन अवॉर्ड मिळणं एका स्वप्नासारखं आहे, असं म्हणत शमीने (Mohammed Shami On Arjuna Award) भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी त्याने दुखापतीवर देखील भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाला Mohammed Shami ?

अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्यावर कसं वाटलं? असा सवाल जेव्हा मोहम्मद शमीला विचारला गेला तेव्हा, "हा पुरस्कार माझ्यासाठी एक स्वप्न आहे, आयुष्य निघून जातं आणि लोक हा पुरस्कार जिंकू शकत नाहीत. या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे, असं म्हणत मोहम्मद शमीला शब्द अनावर झाले. मोहम्मद शमीने त्यावेळी दुखापतीवर देखील भाष्य केलं.

दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. मैदानावर नेहमीच दिसावं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. खेळाडूही लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, लोकांनी मला दिलेल्या प्रेमाचा मी ऋणी राहीन. मी फिट असेल तेव्हा माझा निकाल तुम्हा दिसून येईल. जे काही काम माझ्यावर सोपवले जाते ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. सकारात्मक मानसिकतेने मैदानात खेळाडूने उतरलं पाहिजं, असंही शमीने म्हटलं आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी निवडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसमुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि ईशा सिंग (शूटिंग), शेवटचे पंघल आणि सुनील कुमार (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), पवन कुमार आणि रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खोखो), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)