मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आपला 34 वा वाढदिवस तो साजरा करत आहे. नुकताच राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माचा संघ 7 विकेट्स आणि 9 बॉलने सामना जिंकला आहे. त्यानंतर रोहितचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माची पत्नी रितिकाने आपल्या ट्वीटरवर खास केक कापतानाचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटचं ग्राऊंड या केकवर असल्याचं दिसत आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा रो असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. 




हिटमॅन रोहित शर्मानं IPLच्या इतिहासात 6 वेळा मुंबई संघाला 5 वेळा ट्रॉफी मिळवून दिली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने टी 20 मध्ये  4 तर कसोटीमध्ये 7 आणि वन डेमध्ये 29 शतक केले आहेत. 


IPL 2021मध्ये कर्णधार रोहित शर्माच्या टीमने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांमध्ये मुंबई विजय तर तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावर आहे.