Harbhajan Singh Viral Video: कसोटी क्रिकेटमधील मानाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. कांगारूंनी दमदार विजय नोंदवत चांदी गदा पटकावली. त्यामुळे अनेकजण निराश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एस श्रीसंत हे सध्या लंडनमध्ये (London) आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी कॉमेंट्री पॅनलचा भाग होते. अशातच हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. सध्या हरभजनचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमधील पराभवाचे दु:ख विसरून हरभजन सिंग आणि श्रीसंत लंडनच्या रस्त्यावर देशी स्टाईलमध्ये मस्ती करताना दिसले, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत श्रीसंतही (S. Sreesanth) आहे. होय, तोच श्रीसंत ज्याला हरभजनने लाईव्ह सामन्यात 'थप्पड' मारली होती. आता 15 वर्षानंतर दोन्ही खेळाडू एकत्र येत मस्ती करताना दिसत आहेत.


हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर (InstagramVideo) व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर एक व्यक्ती व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे. 'कल हो ना हो' या गाण्याची मंत्रमुग्ध करणारी धून या व्यक्तीने वाजवली. ही धून ऐकताच हरभजन सिंह आणि श्रीसंत देखील मोहित झाले. दोन्ही खेळाडू शाहरुखच्या (Shah Rukh Khan) सिग्नेचर स्टाईलमध्ये त्याच गाण्याच्या ट्यूनवर पोज देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हरभजनच्या व्हिडिओवर हरभजन सिंहची पत्नी गीताने (Geeta Basra Singh) भन्नाट कमेंट केलीये.


पाहा Video



दरम्यान, तुझी शॉपिंग बॅग जमिनीवर पडलीये विसरू नको, अशी कमेंट हरभजन सिंहची पत्नी गीताने केली आहे. व्हिडिओमध्ये सुरूवातीला हरभजनच्या हातात शॉपिंग बॅग दिसतीये. मात्र, शाहरुखची सिग्नेचर स्टाईल देताना त्याच्या हातातून बॅग खाली पडतीये. या बारीक गोष्टीवर  गीताचं लक्ष गेलं आणि तिने भन्नाट अशी कमेंट केलीये. तिच्या या कमेंटमुळे अनेकांना हसू देखील आवरलं नाही.