Hardik Pandya Abuse: टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खूप चर्चेत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांमध्येही हार्दिक उत्तमरित्या खेळ करतो. यासोबतच सध्या त्याला टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपदंही (Captaincy) देण्यात आलं आहे. मात्र अजून याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पंड्याचे सूर बदलेले दिसून आले. विराटसोबत कथित वाद असल्याची चर्चा असतानात दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिकने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज श्रीलंका विरूद्ध भारत (Ind vs SL ODI) असा दुसरा वनडे सामना खेळवला जातोय. या सामन्यात हार्दिक पंड्याने खुलेपणाने डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूला शिवीगाळ (Hardik Pandya Abuse) केल्याचं दिसून येतंय.


गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्याची इतर खेळाडूंशी असणारा व्यवहार चर्चेचा विषय बनला आहे. टी-20 फॉर्मेटचं कर्धणारपद मिळाल्यानंतर त्याचं वागणं बदललं असल्याचा आरोप केला जातो. अनेकदा तो छोट्या -छोट्या गोष्टींवरून सहकारी खेळाडूंना शिवीगाळ करत असल्याचं समोर आलंय.


Hardik Pandya ची डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूला शिवीगाळ


सोशल मीडियावर एक व्हिडीयो सध्या व्हायरस होतोय. या व्हिडीयोमध्य मागून हार्दिक पंड्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. यावेळी हार्दिक डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंसोबत वाज घालत असल्याचं ऐकू येतंय. या व्हिडीओमध्ये हार्दिकचा चेहरा दिसत नाहीये. मात्र आवाजावरून तो स्पष्टपणे हार्दिकचा असल्याचं समजतंय. 



या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या म्हणतो, शेवटच्या ओव्हरमध्ये मी पाणी मागितलं होतं, आणि यानंतर तो डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंना शिवीगाळ करत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे.


पहिल्या वनडेतंही हार्दिक-विराटचं वाजलं (Ind vs SL First ODI)


पहिल्या प्रसंगामध्ये पांड्यानं विराटला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच धाक देत पांड्याला आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पांड्यानं काही कारणास्तव त्याच्या नजरेला नजरच दिली नाही. यानंतर सामन्यादरम्यान आणखी एका क्षणीसुद्धा त्यांच्यामध्ये असं काही घडलं की इथंही विराटचे संतप्त हावभाव सर्वांनीच पाहिले. 


सोशल मीडियावर या सौम्य बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल


विकेट गेल्यामुळं एकिकडे संघातील सर्वच खेळाडू आनंदाच्या भरात एकमेकांना टाळी देताना दिसले. त्याचवेळी पांड्यानं कळत नकळत विराटकडे दुर्लक्ष दिलं. दुसऱ्याच खेळाडूला टाळी देताना पांड्याचा हात कोहलीच्या टोपीला लागला आणि टोपीसुद्धा जागची हलली. ज्यानंतर विराटनं लगेचच टोपीकडे इशारा करत आपल्याला हे मुळीच आवडलं नसल्याचं इशाऱ्यातून बजावलं. पण, पांड्या ऐकेल तर ना. त्यानं यावेळीसुद्धा दुर्लक्षच केलं. आता पांड्यानं हे नेमकं का केलं, ते मात्र स्पष्ट झालेलं नाही. हो पण, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय याची शक्यता मात्र आणखी गडद होताना दिसत आहे.