Hashim Amla Retirement: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा (South Africa Cricket Team) माजी दिग्गज कर्णधार हाशिम आमला (Hashim Amla) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. आमलाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा होती, तरीही तो सरेसह (surrey) इंग्लिश काउंटी सर्किटवर सक्रिय होता. आमलाने 2022 मध्ये सरेला काउंटी चॅम्पियनशिपचा मुकुट मिळवून दिला. त्यानंतर आता आमलाने अधिकृतरित्या घोषणा केली आहे. (Hashim Amla Announces His Retirement From All Forms Of Cricket latest marathi news)


काय म्हणाला Hashim Amla? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्ती घेतल्यानंतर हाशिमने सांगितले की, "माझ्याकडे ओव्हल मैदानाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि एक खेळाडू म्हणून मी ते सोडल्याबद्दल खूप अवघड आहे. एलेक स्टीवर्ट आणि सर्व कर्मचारी आणि खेळाडू आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. यामध्ये कोणत्याही खेळाडूचा सहभाग असणे हा सन्मान आहे."


दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी त्याने 124 कसोटी सामन्यांच्या 215 डावांमध्ये 46 पेक्षा जास्त सरासरीने 9282 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमलाने 181 सामन्यांच्या 178 डावांमध्ये 49 पेक्षा जास्त सरासरीने 8113 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 44 टी-20 सामन्यांमध्ये 1277 धावा केल्या आहेत.


आणखी वाचा - Ind vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल


हाशिम आमलाने 22 जुलै 2012 रोजी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये त्रिशतक झळकावलं होते. आमलाने इंग्लंडविरुद्ध 311 धावा केल्या होत्या. हाशिम किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही क्रिकेट खेळला आहे आणि सरेसाठीही त्याने चमकदार कामगिरी केल्याचं दिसून आलंय. हाशिम अमलाने काऊंटी क्रिकेटमध्ये देखील अनेक शतकं झळकावली आहेत.