Shubman Gill Double Century : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) न्यूझीलंड विरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात डबल सेंच्यूरी ठोकली आहे.149 बॉलमध्ये त्याने ही डबल सेंच्यूरी ठोकली आहे. या त्याच्या खेळीने क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. तसेच शुभमन गिलने ही डबल सेंच्यूरी (Shubman Gill Double Century)ठोकून अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दरम्यान शुभमनच्या या सेंच्यूरीनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओत शुभमनसाठी क्रिकेट फॅन्स सारा साराच्या नावाने चिअर्स करताना दिसत आहेत.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता शुभमन गिल (Shubman Gill) बाऊंन्ड्री लाईनवर फिल्डींग करत आहेत. या दरम्यान काही तरूण त्याला साराच्या नावाने चिअर्स करत आहेत. खरं तर फिल्डींग करताना शुभमन गिल प्रेक्षकांना पाहून बाऊंन्ड्री लाईनवर येत होता. यावेळी काही फॅन्सना त्य़ाने हात दाखवले. तर काही फॅन्स त्याला साराच्या नावाने चिडवतानाही दिसले. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
शुभमन गिलला (Shubman Gill) गेल्या अनेक वर्षापासून साराच्या नावाने चिडवले जात आहे. मात्र ही सारा कोण आहे? याची माहिती अद्याप लागली नाही आहे.मध्यंतरी तो अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत एका हॉटेलमध्ये स्पॉट झाला होता. त्यामुळे ही सारा तीच असावी असा अंदाज होता.मात्र आणखीण एक सारा देखील आहे, तिच्यासोबत देखील त्याचे नाव जोडले जाते. ही सारा म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar). त्यामुळे नेमक्या कोणत्या सारासोबत त्याचे रिलेशनशीप आहे, अद्याप कळू शकले नाही आहे.
टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Spectators chant 'Sara - Sara' near boundary rope where Shub...
.
.
.#sara #ShubhmanGill #cricket #reels #video #theboysmemes pic.twitter.com/0x1ZWyw255— बाबा नौटंकीवाले (@nautankivale) January 18, 2023
दरम्यान न्यूझीलंड विरूद्ध शुभमन गिलने (Shubman Gill)डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल् सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने (Team India)8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान न्यूझीलंड पुर्ण करते की टीम इंडियाचे बॉलर्स त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.